पुणे : शेतीमध्ये दिवसेंदिवस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. शेतकरी देखील पारंपरिक शेतीला या नव्या तंत्रज्ञानाची जोड देत आहे. कमी खर्चात अधिक नफा देणारी शेती या तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. आता शेतकऱ्यांना फक्त 7 मिनिटांत एक एकर शेतीची फवारणी करता येणार आहे. पुण्यातील तिघा मित्रांनी हे अत्याधुनिक ड्रोन तयार केलंय. कृषी उडान ड्रोन मशीन हे पुण्यातील कृषी महाविद्यालयात भरलेल्या कृषी प्रदर्शनात पाहायला मिळतेय. याबाबत लोकल18 च्या माध्यमातून कृषी उडान कंपनीचे ऋषिकेश राणे यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
शेतकऱ्यांना काही पिकांची वेळच्या वेळी फवारणी करणे गरजेचे असते. त्यात पारंपरिक पद्धतीने फवारणीला वेळ जास्त लागतो आणि खर्चही अधिक येतो. यावर पर्याय म्हणून पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मित्रांनी एकत्र येत कृषी उडान स्टार्ट अप सुरू केला आहे. ऋषिकेश राणे, विशाल पाटील, सारंग माने आणि प्रणव राजपूत यांनी शेतकऱ्यांसाठी खास ड्रोन तयार केला. या कृषी उडान ड्रोनच्या माध्यमातून फक्त 7 मिनिटांत एक एकर क्षेत्राची फवारणी करता येतेय. विशेष म्हणजे अगदी कमी वेळेत, कमी पाण्यात आणि कमी खर्चात चांगल्या पद्धतीने फवारणी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचं राणे सांगतात.
विषमुक्त भाजीपाल्यासाठी डॉक्टरांचा उपाय, परराज्यातून मागणी, लाखोंची उलाढाल
कसा आहे ड्रोन?
कृषी उडान ड्रोनला 6 मोटार आहेत. हातात रिमोट कंट्रोल असल्याने कुठे आणि किती उंचीवर पाठवायचे याची कमांड देता येते. हा 10 लिटरचा ड्रोन आहे. याच्या माध्यमातून एका दिवसात 30 ते 40 एकर फवारणी करता येते. या ड्रोनची किंमत 3.5 लाखांपासून पुढे आहे. ड्रोन चालवण्यासाठी पायलट परवाना काढावा लागतो. एका ठिकाणाहून हे ड्रोन 2 किलोमीटर अंतरापर्यंत पाठवता येऊ शकतं. तसेच 300 ते 400 फूट उंच उडू शकतं, असंही राणे सांगतात.
अनुदानही उपलब्ध
कृषी उडान ड्रोनसाठी अनुदान देखील उपलब्ध आहे. महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून ड्रोनसाठी अदान घेता येते. गेल्या 3 वर्षांपासून हा स्टार्टअप सुरू असून मुख्य कार्यालय औंधला आहे. तर राज्यभरात आम्हाला कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रांचा पुरवठा करायचा आहे, असंही राणे सांगतात.