TRENDING:

Stamp Duty:..तर ५० दिवसांत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार! मुद्रांक शुल्काबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय

Last Updated:

Stamp Duty Refund : कॅन्सलेशन डीड नंतर मुद्रांक शुल्काचा परतावा मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : कॅन्सलेशन डीड नंतर मुद्रांक शुल्काचा परतावा मिळण्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयकात बदल करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या अधिकारात वाढ करण्यात आली आहे.
Stamp Duty
Stamp Duty
advertisement

या नव्या तरतुदीनुसार, सुमारे २० लाख रुपयांपर्यंतच्या मुद्रांक शुल्काचा परतावा आता मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावरूनच मंजूर होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पूर्वीप्रमाणे अनेक महिने प्रतीक्षा न करता ४५ ते ५० दिवसांतच रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्याची सुविधा मिळणार आहे.

परताव्याची प्रक्रिया होणार जलद

आतापर्यंत मुद्रांक शुल्काच्या परताव्यासाठी नागरिकांना विविध कार्यालयांमध्ये पाठपुरावा करावा लागत होता. परताव्याची रक्कम कितीही असली तरी अर्ज प्रथम मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडेच करावा लागत होता.

advertisement

५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांचा निर्णय सह जिल्हा निबंधक स्तरावर होत होता, मात्र त्यापुढील रकमेच्या प्रकरणांसाठी नोंदणी उपमहानिरीक्षक किंवा इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे फाईल जावी लागत होती. त्यामुळे प्रक्रिया लांबणीवर पडत होती.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दरवर्षी सुमारे ३ हजार परताव्याची प्रकरणे दाखल होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात विलंबाचा सामना करावा लागत होता.

advertisement

अधिकारात वाढ, नवीन मर्यादा काय?

सुधारित नियमांनुसार विविध अधिकाऱ्यांच्या अधिकारात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. जी खालील प्रमाणे आहे.

मुद्रांक जिल्हाधिकारी: ५ लाखांवरून वाढ करून आता २० लाखांपर्यंत

नोंदणी उपमहानिरीक्षक: २० लाखांवरून वाढ करून ५० लाखांपर्यंत

अपर मुद्रांक नियंत्रक: २० लाखांवरून वाढ करून १ कोटीपर्यंत

नोंदणी महानिरीक्षक: अधिकार वाढवून १ कोटी रुपयांपर्यंत

advertisement

या बदलामुळे बहुतांश प्रकरणे जिल्हास्तरावरच निकाली निघणार असून उच्चस्तरीय कार्यालयांवरील ताणही कमी होणार आहे.

नागरिकांना दिलासा,हेलपाटे कमी होणार

पूर्वी मोठ्या रकमेच्या परताव्यासाठी नागरिकांना अनेक महिने प्रतीक्षा करावी लागत होती तसेच विविध कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आता अधिकारांचे विकेंद्रीकरण झाल्याने ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

advertisement

लवकरच अधिसूचना काढणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महिनाभरात अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार असल्याची माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या/कृषी/
Stamp Duty:..तर ५० दिवसांत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार! मुद्रांक शुल्काबाबत महसूल विभागाचा मोठा निर्णय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल