TRENDING:

Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video

Last Updated:

अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. सागर धन्यधर या तरुणाने आयटीसी येथील नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
छत्रपती संभाजीनगर : अनेक तरुण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत. फुलंब्री तालुक्यातील धामणगाव येथील सागर धन्यधर या तरुणाने आयटीसी येथील नोकरी सोडून हॉटेल व्यवसाय केला मात्र त्यात यश मिळाले नाही. स्वतःचा व्यवसाय असावा आणि त्यातून कमाई चांगली व्हावी या हेतूने सागरने गावरान अंड्यांची बाजारातील मागणी लक्षात घेता, सुरुवातीच्या काळात 200 कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केला, त्यातून गावरान अंडी विक्री होऊ लागली.
advertisement

गावरान अंड्यांची होम सर्व्हिस देणे, स्टॉलच्या माध्यमातून विक्री करणे. सध्या दररोज 900 अंडी निघतात. या सर्व कोंबड्यांना तो शेतात पिकवलेलं नैसर्गिक अन्न खायला देतो, या अंडी विक्रीच्या फार्म मधून तो 70 हजार रुपये महिन्याकाठी कमाई करत असल्याचे धन्यधरने लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.

advertisement

Farmer Success Story: शिक्षण बारावी पास, शेतकऱ्यानं निवडला डाळिंब शेतीचा मार्ग, 6 लाखांचे उत्पन्न!

गावरान अंडी कशी ओळखाल ?

गावरान अंड्याच्या नावाखाली बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असते मात्र गावरान अंडं कसं ओळखावे ते जाणून घेऊ. सर्वप्रथम गावरान अंड्यांचे वजन 45 ग्रॅमच्या वर नसते, यामध्ये ब्राऊन शेड, व्हाईट शेड असे दोन्ही प्रकार असतात, तसेच या अंड्याची साईज छोटी असते. या सर्व बाबींची तपासणी करून तुम्ही अंडी खरेदी केली तर तुमची फसवणूक टाळता येऊ शकते.

advertisement

तरुणांना संदेश देताना धन्यधर सांगतो की शेतकरी असो किंवा तरुण मंडळी यांनी कोंबडी पालन उतरावे जेणेकरून या माध्यमातून त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. सुरुवातीला कमी कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू केला तरी चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. शेतकऱ्यांना पिल्ले देण्याचं काम देखील या ठिकाणी होते. सकाळी आणि संध्याकाळी या फार्मचे नियोजन करण्यात येते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
Farmer Success Story: नोकरी सोडली, तरुण करतोय आता गावरान अंड्यांची विक्री, महिन्याला होते इतकी कमाई, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल