दिवाळीनंतर सांगलीत झालेल्या बेदाणा सौद्यामध्ये तेरा दुकानांमध्ये 11 हजार बॉक्सची आवक झाली. त्यास प्रतिकिलो 425 रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. त्यामुळे सुरुवातीच्या सौद्यातच 25 ते 30 रुपये बाजारभाव वाढल्याने बेदाणा उत्पादक शेतकरी समाधानी आहेत. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाजार समितीत बेदाणा विक्रीसाठी आणावा, असे आवाहन केले जात आहे.
Krushi Market Today Rate: सोयाबीन उत्पादकांना उत्तम बाजारभाव, कांद्यासह इतर शेतमालांची स्थिती काय?
advertisement
दहा व्यापाऱ्यांवर बेदाणा सौद्यात बंदी
दिवाळी सुट्टीत आणि शून्य पेमेंटसाठी सांगली, तासगाव, पंढरपूर बाजारातील सौदे बंद ठेवण्यात आले होते. चालू वर्षी बेदाण्याचे भाव वाढल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे येणे-देणे शिल्लक होते. पण बेदाणा असोसिएशनने शून्य पेमेंटची काटेकोर अंमलबजावणी केल्याने यंदा केवळ दहा व्यापाऱ्यांवरच बेदाणा सौद्यात बंदी घालण्यात आली असल्याची माहिती बेदाणा असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आली आहे.
असे आहेत दर
चांगल्या दर्जाच्या हिरव्या बेदाण्यास 360 ते 425 रुपये प्रतिकिलो प्रमाणे सर्वाधिक भाव आहे. पिवळ्या बेदाण्यास 300 ते 390 रुपये प्रतिकिलो प्रमाणे तसेच मध्यम दर्जाच्या हिरव्या बेदाण्यास 250 ते 350 रुपये प्रतिकिलो प्रमाणे बाजारभाव मिळाला. काळ्या बेदाण्यास प्रतीनुसार 140 ते 160 रुपये दरम्यान सर्वात कमी भाव मिळाला.






