केळी दरात सुधारणा: राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 443 क्विंटल केळीची आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 340 क्विंटल सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 900 ते जास्तीत जास्त 1800 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 103 क्विंटल केळीस सर्वसाधारण 2300 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
गुळास चांगला उठाव: राज्याच्या मार्केटमध्ये 995 क्विंटल गुळाची एकूण आवक झाली. यापैकी 330 क्विंटल सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार 4225 ते 4351 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 235 क्विंटल गुळास प्रतीनुसार 5200 ते 5700 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
आल्याची आवक स्थिर: राज्याच्या मार्केटमध्ये 2860 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1430 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 847 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 3425 ते 6500 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.