श्रावण महिन्यामधील प्रत्येक सोमवार, रक्षाबंधन या सणाच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या सुगंधी मनमोहक फुलांची आवक वाढली असून पंढरपूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ आणि उत्तर सोलापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर फुले बाजारात येत आहेत. झेंडू फुलाचा वापर पूजा, हार, तसेच मंदिर आणि घर सजवण्यासाठी केला जातो. तसेच रक्षाबंधन सारख्या सणांमध्ये मोगरा आणि जुई यांनाही मागणी अधिक आहे. तर श्रावण महिन्यात झेंडूचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने सध्या फुलाचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
advertisement
फुलांचे सध्याचे दर
सध्या झेंडू फुलाचे दर 60 ते 70 रुपये किलो मिळत आहे. तर गुलाब फुलाचे दर सुद्धा वाढलेले असून 80 रुपये किलो दराने मिळणारा गुलाब आता 140 ते 150, रुपये किलो दराने मिळत आहे. फुलाची दर वाढल्यामुळे हाराचे दर देखील वाढले आहे. येथे आठवड्यामध्ये फुलांच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषत: शेवंतीचे दर 5 ते 20 रुपये प्रति किलो पर्यंत वाढू शकतात. शेवंतीच्या फुलाची चार ते पाच दिवस टिकण्याची क्षमता असल्याने ग्राहकांचा कल या फुलांकडे आहे. सणासुदीच्या काळात फुलांचे दर आणखी वाढण्याचा अंदाज फुल व्यापारी मेहबूब शेख यांनी व्यक्त केला आहे.





