आल्याच्या आवकेत घट
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 2179 क्विंटल आल्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 985 क्विंटल आल्याची आवक झाली. त्यास प्रतीनुसार 4000 ते 5600 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच नागपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 9 क्विंटल आल्यास 6106 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
वारे वाहणार अन् विजांचा कडकडाट होणार, महाराष्ट्रावर मोठं संकट, हवामान खात्याकडून अलर्ट
advertisement
शेवग्याची आवक दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 323 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे मार्केटमध्ये सर्वाधिक 168 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 6000 ते 11000 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्याची सर्वात कमी आवक राहिली. त्यास 80000 रुपये बाजारभाव मिळाला.
डाळिंबाच्या दरात चढ-उतार
आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 1765 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी नागपूर मार्केटमध्ये 1108 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 2000 ते 6000 रुपये दरम्यान दर मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 7 क्विंटल डाळिंबास 15000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सर्वाधिक बाजारभाव मिळाला.





