अशी राहिली मका आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 30 हजार 584 क्विंटल मक्याची आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 7 हजार 705 क्विंटल सर्वाधिक मका आवक झाली. त्यास मक्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 1238 ते जास्तीत जास्त 1651 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 127 क्विंटल मक्यास 2800 ते 3500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
कांद्याची उच्चांकी आवक
राज्याच्या मार्केटमध्ये 2 लाख 30 हजार 381 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 1 लाख 27 हजार 106 क्विंटल सर्वाधिक आवक नाशिक बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 307 ते जास्तीत जास्त 1332 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 400 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1500 ते 2500 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजारभाव मिळाला. तसेच ठाणे मार्केटमध्ये 3 क्विंटल कांद्याची सर्वात कमी आवक होऊन त्यास 1100 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
सोयाबीन उत्पादकांची कोंडी
राज्याच्या मार्केटमध्ये 1 लाख 35 हजार 658 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 31 हजार 553 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3525 ते 4255 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच वाशिम मार्केटमध्ये आवक झालेल्या 2400 क्विंटल सोयाबीनला 3950 ते 4670 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. नांदेड मार्केटमध्ये सर्वात कमी 17 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3800 ते 4100 रुपये दरम्यान बाजारभाव मिळाला.