आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य राहील. पैशांची चिंता मिटताना दिसेल आणि अचानक धनलाभ झाल्यामुळे मन प्रसन्न होईल. पण व्यवसायात मात्र थोडी काळजी घ्या, विचार न करता मोठी गुंतवणूक केल्यास नुकसान होऊ शकतं. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः पोटाचे विकार किंवा पचनसंस्थेच्या तक्रारी जाणवू शकतात. जोडीदारासोबतचा वेळ मजेत जाईल.
अंक 2 (कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला जन्मलेले लोक)
advertisement
तुमचं नशीब आज जोरावर आहे. जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होईल, त्यामुळे पैशांची चणचण भासणार नाही. मानसिकदृष्ट्या तुम्ही खूप समाधानी असाल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखू शकता. जोडीदाराशी प्रेमाने वागल्यास नात्यात अधिक गोडवा येईल.
अंक 3 (कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला जन्मलेले लोक)
आज थोडा मानसिक ताण जाणवू शकतो, पण आर्थिक आघाडीवर दिवस चांगला आहे. धनलाभाचे योग आहेत. व्यवसायासाठी नवीन भागीदारीचे प्रस्ताव येतील, ज्यांचा भविष्यात फायदा होईल. आरोग्याची मात्र आज काळजी घ्या, दिवसभर डोकेदुखीचा त्रास सतावू शकतो. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील आणि जोडीदाराची साथ मिळेल.
दर्श अमावस्या-सूर्यग्रहण असतानाच पंचक लागणार; सलग 5 दिवस घातक परिणाम, अलर्ट
अंक 4 (कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच छान आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात नशीब साथ देईल आणि कामाच्या निमित्ताने परदेश प्रवासाचे योगही येऊ शकतात. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर आजचा दिवस त्यासाठी अनुकूल आहे. घरच्यांसोबत वेळ आनंदात जाईल, फक्त जोडीदाराशी संवाद जपून साधा.
अंक 5 (कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस संमिश्र असेल. पैशांची गुंतवणूक करताना खूप विचार करून पाऊल उचला. व्यवसायात प्रगतीचे नवीन मार्ग दिसतील, पण नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमध्ये सावध राहावे. सहकाऱ्यांशी वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रागावर ताबा ठेवा. कुटुंबात शांतता असेल आणि जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील.
अंक 6 (कोणत्याही महिन्याच्या 6, 15 किंवा 24 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. अचानक धनलाभ झाल्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. व्यवसायात नफा मिळेल. नोकरीत तुमच्या कल्पक बुद्धीमुळे कामाचं कौतुक होईल आणि पगारवाढीच्या चर्चाही होऊ शकतात. घरात मनोरंजनाचा कार्यक्रम आखाल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. जोडीदारासोबतचा दिवस सुखद असेल.
अंक 7 (कोणत्याही महिन्याच्या 7, 16, आणि 25 तारखेला जन्मलेले लोक)
आज तुम्ही थोडे अध्यात्माकडे वळाल. स्वभावात सर्जनशीलता असेल. आर्थिक बाबतीत दिवस चांगला असून कामात प्रगती होईल. व्यवसायाचा विस्तार करण्यास वाव मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आणि जोडीदारासोबतचा वेळ खूप छान जाईल. तुमची सकारात्मक वृत्ती आज तुम्हाला यश मिळवून देईल.
दाराच्या तोंडाला उलटी चप्पल म्हणजे..! घरात भांडण, अशुभ गोष्टी घडण्याला कारण ठरतं
अंक 8 (कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेले लोक)
आजचा दिवस थोडा सावधगिरीने घालवण्याचा आहे. पैशांची गुंतवणूक आज अजिबात करू नका. नोकरीच्या बाबतीत मात्र नशीब साथ देईल, जर नोकरी बदलण्याचा विचार असेल तर पुढे जाण्यास हरकत नाही. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन करू शकता. जोडीदारासोबतचा दिवस प्रेमाचा असेल.
अंक 9 (कोणत्याही महिन्याच्या 9, 18 आणि 27 तारखेला जन्मलेले लोक)
तुमच्यासाठी आजचा दिवस उत्साहाचा असेल. वडिलांचा सल्ला घेऊन पैशांची गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल. व्यवसायासाठी नवीन रस्ते खुले झाल्यामुळे तुम्हाला मनातून खूप आनंद वाटेल. ऑफिसमध्ये तुमच्या चातुर्याचं कौतुक होईल आणि पगारवाढीची चिन्हे आहेत. घरात एखादं शुभ कार्य किंवा सोहळा घडून येईल.
