आदित्य जोशी गुरुजी यांच्या मते, 2026 हे वर्ष भीती निर्माण करणारे नसून समजून घेतले तर संतुलित आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. शनी ग्रह सध्या कुंभ, मीन आणि मेष या राशींमध्ये असून तो 2 जून 2027 पर्यंत याच राशींमध्ये भ्रमण करणार आहे. त्यामुळे येत्या 2026 या नववर्षात शनीमुळे मोठे संकट ओढवेल, असा समज चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
advertisement
मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार! ‘या’ राशींना हवं ते मिळणार, तुमच्या नशिबी काय? पाहा आजचं राशीभविष्य
दाते पंचांगानुसार 2026 मध्ये शनीचा प्रभाव राशींवर टप्प्याटप्प्याने जाणवणार आहे. यामध्ये मीन राशीवर शनीचा प्रभाव पहिल्या क्रमांकावर राहणार असून त्यानंतर कुंभ, मकर, धनु, वृश्चिक, तुला, कन्या, सिंह, कर्क, मिथुन, वृषभ आणि शेवटी मेष या राशींवर शनीचा प्रभाव दिसून येईल. मात्र हा प्रभाव त्रासदायकच असेल असे नाही, तर तो प्रत्येकाच्या कर्मावर अवलंबून राहणार आहे.
विशेषतः कुंभ, मीन आणि मेष या राशींना 2026 मध्ये शनीची पीडा काही प्रमाणात जाणवू शकते. मात्र योग्य उपाययोजना आणि सकारात्मक कर्म केल्यास ही पीडा कमी करता येऊ शकते, असे गुरुजी सांगतात.
2026 मध्ये या चुका नकोच
शनी हा कर्मप्रधान ग्रह मानला जातो. मनुष्य जसे कर्म करतो, त्याच प्रकारचे फळ शनी देतो. सत्य, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि संयम यांचा अवलंब केल्यास शनी अनुकूल ठरतो, तर खोटेपणा, फसवणूक आणि अन्याय केल्यास शनी कठोर भूमिका घेतो. त्यामुळे 2026 या कालावधीत सत्य बोलणे, सत्याचे आचरण करणे आणि चुकीच्या मार्गापासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
शनीची पीडा कमी करण्यासाठी...
शनीची पीडा कमी करण्यासाठी कुंभ, मीन आणि मेष राशीच्या व्यक्तींनी 2026 मध्ये विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाचे तेल, काळे उडीद अर्पण करणे, शनी मंत्र व शनी स्तोत्राचे पठण करणे उपयुक्त ठरेल. तसेच हनुमान चालीसा किंवा सुंदरकांडाचे पठण केल्यास शनीची पीडा कमी होते, असा अनुभव असल्याचे गुरुजी सांगतात.
एकूणच 2026 हे वर्ष शनीच्या भीतीने घाबरण्याचे नसून आत्मपरीक्षणाचे आणि कर्म सुधारण्याचे आहे. अफवांवर विश्वास न ठेवता योग्य मार्ग अवलंबल्यास हे वर्ष अनेक राशींसाठी लाभदायक ठरू शकते, असे मत ज्योतिषाचार्य आदित्य जोशी गुरुजी यांनी व्यक्त केले आहे.





