Amavasya 2025: वर्षभर छळलंय! सरत्या वर्षात पितृदोषातून घर मुक्त करा; शेवटच्या अमावस्येचे जालीम उपाय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Amavasya 2025: दर्श अमावस्या 19 डिसेंबर या शुक्रवारी येत आहे. दर्श अमावस्या ही हिंदू पंचांगात अत्यंत पवित्र मानली जाते. चांद्र महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणतात. शास्त्रानुसार या दिवसाचा संबंध पितृकार्य, देवकार्य आणि आत्मशुद्धीशी आहे.
मुंबई : मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला या वर्षातील शेवटची अमावस्या आहे. या मार्गशीर्ष अमावस्येला दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं. दर्श अमावस्या 19 डिसेंबर या शुक्रवारी येत आहे. दर्श अमावस्या ही हिंदू पंचांगात अत्यंत पवित्र मानली जाते. चांद्र महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणतात. शास्त्रानुसार या दिवसाचा संबंध पितृकार्य, देवकार्य आणि आत्मशुद्धीशी आहे. ज्योतिष शास्त्रानुसार मार्गशीर्ष अमावस्येला पितृदोष आणि राहू-केतू दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय करणं खूप फायद्याचं ठरतं. हे उपाय केल्यानं अनेक समस्या दूर होतात आणि दोषांपासून मुक्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
दर्श अमावस्येचं महत्त्व -
दर्श अमावस्येवर पितरांचा विशेष अधिकार असतो असं मानलं जातं. या दिवशी केलेलं तर्पण, पिंडदान आणि दान यामुळे पितर लवकर तृप्त होतात आणि त्यांचा आशीर्वाद मिळतो. अमावस्या ही चंद्राशी संबंधित तिथी असल्यानं मानसिक अस्वस्थता, भीती, नैराश्य किंवा चंद्र दोषाचा त्रास असेल, तर या दिवशी केलेलं दान आणि जप खूप लाभदायक ठरतो.
advertisement
पंचांगानुसार अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी सुरू होऊन दुपारी 12 वाजून 39 मिनिटांपर्यंत असेल. तर राहूकाळाची वेळ सकाळी 11 वाजून 1 मिनिटापासून दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील. या दिवशी सूर्य धनु राशीत असेल आणि चंद्र रात्री 10 वाजून 51 मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत राहिल्यानंतर धनु राशीत प्रवेश करेल.
advertisement
दर्श अमावस्येच्या दिवशी काय करावं?
दर्श अमावस्येला सकाळी पवित्र नदीत स्नान करावं. जर नदीवर जाणं शक्य नसेल, तर घरीच अंघोळीच्या पाण्यात थोडं गंगाजल मिसळावं. अंघोळ करताना आपल्या पितरांचं स्मरण केल्यानं ते प्रसन्न होतात. त्यानंतर ओम पितृभ्यः स्वधा नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. स्नानानंतर काळे तीळ, पाणी वापरून पितृ तर्पण करावं. शक्य असल्यास ब्राह्मणाला जेवण द्यावं आणि गाय, अन्न किंवा तिळाचं दान करावं. संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या किंवा तुळशीच्या झाडापाशी दीपदान करावं.
advertisement
दर्श अमावस्या 2025 उपाय -
मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी अख्खे उडीद आणि घोंगडीचं दान करणं शुभ मानलं जातं. यामुळे पितर प्रसन्न होतात आणि राहू-केतूचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. अमावस्येला पक्ष्यांना दाणापाणी देणं सुद्धा खूप चांगलं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार पितर पक्ष्यांच्या रूपात येऊन अन्नाचा स्वीकार करतात, ज्यामुळे त्यांना शांती मिळते. पितरांच्या कृपेनं घरात सुख-समृद्धी येते, करिअरमध्ये यश मिळतं आणि वंशवृद्धी होते. आपल्या ग्रंथात असंही सांगितलं आहे की या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक केल्यानं आणि पिंपळाच्या झाडाला कच्चं दूध व काळे तील अर्पण केल्यानं पितृ दोषाचं शमन होतं आणि सौभाग्याची प्राप्ती होते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 2:49 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amavasya 2025: वर्षभर छळलंय! सरत्या वर्षात पितृदोषातून घर मुक्त करा; शेवटच्या अमावस्येचे जालीम उपाय











