इतिहास घडवणारी पहिली मिस इंडिया काळाच्या पडद्याआड, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Meher Castelino : पहिल्या मिस इंडिया मेहर कॅस्टोलिनो यांचे निधन झाले आहे. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
advertisement
1960 आणि 1970 च्या दशकात मेहर कॅस्टेलिनो यांनी आपल्या मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर फॅशन इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. देशातील पहिल्या मिस इंडिया न होता मेहरा यांनी फॅशन जर्नलिज्समला एक नवी दिशा दिली. मेहर कॅस्टेलिनो यांच्या पश्चात आता त्यांचा मुलगा कार्ल, सून निशा आणि मुलगी क्रिस्टिना आहे.
advertisement
advertisement
मेहर कॅस्टेलिनो यांच्या पत्रकारितेच्या करिअरची सुरुवात 1973 मध्ये झाली. ईव्स वीकलेमध्ये त्यांचा पहिला लेख प्रकाशित झाला होता. त्यानंतर त्या खऱ्या अर्थाने फॅशन पत्रकार झाल्या. 130 राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रे आणि मासिकांमध्ये त्यांचे लेख छापले जात असे. फॅशन आणि लाइफस्टाईलसाठी त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे.
advertisement
advertisement
advertisement








