Teacher Recruitment : शिक्षक भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट! स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू, अंतिम मुदत किती?

Last Updated:

Teacher Recruitment Maharashtra : शिक्षक पदांसाठी स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया पवित्र पोर्टलवर सुरू झाली आहे. उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाईन नोंदणी करून स्वतःचे स्व-प्रमाणपत्र भरावे अन्यथा पुढील भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही.

News18
News18
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून शिक्षक पदभरतीसाठी पवित्र पोर्टलवर उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे उमेदवार स्वतःची माहिती ऑनलाईन नोंदवू शकतील. स्व-प्रमाणपत्र भरण्यापूर्वी उमेदवाराने पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी शाळा आणि महाराष्ट्र शासनाच्या इतर शाळांमध्ये शिक्षणसेवक आणि शिक्षक पदांसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ऑनलाईन घेण्यात आली होती. ही परीक्षा 27 मे ते 30 मे आणि 2 जून ते 5 जून या कालावधीत पार पडली. या परीक्षेस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,09,101 उमेदवारांना पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
advertisement
लक्षात ठेवा 'या' गोष्टी
शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र भरणे बंधनकारक आहे. उमेदवाराने नोंदणी आणि स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया स्वतः करणे आवश्यक आहे. अर्ज मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे पण नोंदणीसाठी इंग्रजीमध्ये माहिती भरावी.
नोंदणी करताना संक्षिप्त नाव, आद्याक्षरे वापरू नयेत पूर्ण नाव, वडिलांचे नाव, पतीचे नाव, आडनाव आणि संपूर्ण पत्ता व्यवस्थित लिहावा. नाव आणि पत्त्यामध्ये योग्य जागा सोडावी. इमारत, रस्ता आणि परिसर यांची माहिती स्पष्ट लिहावी ज्यामुळे कोणतीही गडबड होणार नाही.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Teacher Recruitment : शिक्षक भरतीसंदर्भात महत्वाची अपडेट! स्व-प्रमाणपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू, अंतिम मुदत किती?
Next Article
advertisement
Pradnya Satav Join BJP: ''राजीव सातीव यांच्या...'', काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळं सांगितलं
''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं
  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

View All
advertisement