Bharat Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! भारत टॅक्सी 1 जानेवारीपासून सुरु; पण ही मोठी अपडेट समोर
Last Updated:
Western Railway Digital Lounge : आता रेल्वे स्थानकावर डिजिटल लाऊंज सुरु झाले आहे. येथे प्रवाशे आरामात बसेस किंवा ट्रेनच्या वाटेत असतानाही ऑफिसचे काम, ऑनलाईन मिटिंग्स आणि इतर कामे करता येतील.
ओला आणि उबरसारख्या मोठ्या टॅक्सी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी 1 जानेवारी 2026 पासून भारत टॅक्सी हे नवीन अॅप लाँच होणार आहे. हे अॅप पूर्णपणे सहकारी मॉडेलवर आधारित असून प्रवासी आणि ड्रायव्हर्स दोघांच्याही फायद्यासाठी तयार करण्यात आले आहे.
भारत टॅक्सी 1 जानेवारीपासून येणार
या अॅपमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. सध्या ओला-उबरमध्ये पीक आवर्समध्ये भाडे अचानक वाढते. मात्र भारत टॅक्सी अॅपमध्ये अशा अनियंत्रित भाडेवाढीवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वस्त आणि योग्य दरात प्रवास करता येणार आहे.
प्रवाशांसाठी 'ही' माहिती महत्त्वाची
भारत टॅक्सी अॅप सहकार टॅक्सी को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या संस्थेद्वारे चालवले जाणार आहे. या मॉडेलमध्ये ड्रायव्हर स्वतः या व्यवस्थेचा भाग असतील. कारसोबतच ऑटो आणि बाईक टॅक्सी सेवाही या अॅपवर उपलब्ध असणार आहेत. सुरुवातीला हे अॅप दिल्लीत लाँच केले जाणार असून तिथे याची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. आतापर्यंत सुमारे 56 हजार ड्रायव्हर्सनी नोंदणी केली आहे.
advertisement
ड्रायव्हर्ससाठी हे अॅप अधिक फायदेशीर ठरणार आहे. सध्या ओला-उबरमध्ये ड्रायव्हर्सना भाड्याचा सुमारे 70 टक्के हिस्सा मिळतो. मात्र भारत टॅक्सी अॅपमुळे ड्रायव्हर्सना 80 टक्क्यांहून अधिक हिस्सा मिळणार आहे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि खासगी कंपन्यांवरचे अवलंबन कमी होईल.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी या अॅपमध्ये दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्यानं अनेक सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. दिल्लीनंतर गुजरातमधील राजकोट येथेही चाचणी सुरू असून 1 फेब्रुवारीपासून तिथे सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्यानं हे अॅप संपूर्ण देशभर सुरू करण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 18, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bharat Taxi : प्रवाशांसाठी खुशखबर! भारत टॅक्सी 1 जानेवारीपासून सुरु; पण ही मोठी अपडेट समोर









