Tatkal Ticket: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, मोबाईल...

Last Updated:

Tatkal Ticket Booking: मध्य रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग नियमांत बदल करण्यात आला आहे. आता पुण्यातून धावणाऱ्या 5 महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

Tatkal Ticket: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, मोबाईल...
Tatkal Ticket: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, मोबाईल...
पुणे : रेल्वे प्रशासनाकडून तत्काळ तिकीट बुकिंगची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यात येत आहे. त्यासाठी ओटीपीद्वारे पडताळणीची नवी पद्धत टप्प्याटप्प्याने लागू केली जात आहे. या बदलाअंतर्गत 19 डिसेंबरपासून पुण्याशी जोडलेल्या मध्य रेल्वेच्या आणखी पाच गाड्यांवर ही व्यवस्था लागू होणार आहे. या नव्या पद्धतीमुळे तिकीट बुकिंग अधिक पारदर्शक होईल आणि गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी प्रणाली
ओटीपीद्वारे तत्काळ तिकीट बुकिंगची नवी पद्धत ज्या गाड्यांवर लागू होणार आहे, त्यामध्ये पुणे–अमरावती एक्सप्रेस (11025) आणि पुणे–सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस (12157) यांचा समावेश आहे. तसेच सीएसएमटी–कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (11029), एलटीटी–गोंडा गोदान एक्सप्रेस (11055) आणि एलटीटी–जयनगर एक्सप्रेस (11061) या गाड्यांवरही ही व्यवस्था लागू केली जाणार आहे.
advertisement
मोबाईलवर येणार ओटीपी
नव्या तिकीट बुकिंग व्यवस्थेनुसार प्रवासी आरक्षण काउंटर, अधिकृत एजंट तसेच IRCTCच्या वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवरून केलेल्या तत्काळ तिकीट बुकिंगसाठी ओटीपी देणे आवश्यक राहणार आहे. बुकिंगवेळी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल आणि तो ओटीपी टाकल्यानंतरच तिकीट निश्चित होणार आहे.
ओटीपी पडताळणीदरम्यान अडचण येऊ नये, यासाठी तत्काळ तिकीट बुकिंग करताना प्रवाशांनी स्वतःचा चालू आणि योग्य मोबाईल क्रमांक नोंदवावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. त्यामुळे तिकीट बुकिंगची प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Tatkal Ticket: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, तत्काळ तिकीट बुकिंगसाठी नवे नियम, मोबाईल...
Next Article
advertisement
Pradnya Satav Join BJP: ''राजीव सातीव यांच्या...'', काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळं सांगितलं
''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं
  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

  • ''राजीव सातीव यांच्या...'', भाजपात प्रवेश करताच प्रज्ञा सातवांनी सगळंच सांगितलं

View All
advertisement