स्वाक्षरी (सही) ज्योतिष तज्ज्ञ विवेक त्रिपाठी लोकांच्या सह्यांचे विश्लेषण करून अनेक आश्चर्यकारक तथ्ये उघड करण्यात माहीर आहेत. त्यांच्या मते सही करताना नावातील पहिल्या अक्षराला क्रॉस चिन्ह करू नये, असं करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. पहिले अक्षर क्रॉस करणे अशुभ मानले जाते. अशा लोकांचा कधीतरी मोठा अपघात होऊ शकतो. ते लोक रस्ते अपघाताचे बळी ठरू शकतात किंवा गंभीर इजा होऊ शकते.
advertisement
सही करताना पहिल्या अक्षरावर कधी आडवी रेष ओढू नये. याचा अर्थ तुम्ही एक प्रकारे तुमचे अस्तित्वच कापत आहात. अशा लोकांचा अपघात झाला तर त्यांना कंबरेवरील भागात दुखापत होते. या प्रकारच्या सही प्रकारामुळे शरीराच्या वरच्या भागावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय अशा प्रकारची सही करणाऱ्यांवर कधीतरी मोठी वैद्यकीय शस्त्रक्रिया होण्याची शक्यता जास्त असते. खराब आरोग्यामुळे त्यांचे ऑपरेशन होऊ शकते.
आपण बारकाईने लक्ष द्याल तर तुमच्या लक्षात येईल की, अशा प्रकारे सही करणाऱ्या लोकांच्या बेडरूममध्ये जास्त औषधे असतात, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये डॉक्टरांचे नंबर जास्त असतात. चुकीच्या पद्धतीनं सही करत असल्यानं असं होऊ शकतं.
उपाय काय आहे?
तुम्हीही अशी सही करत असाल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तुम्ही तुमची सहीची पद्धत ताबडतोब बदलली पाहिजे. आपल्या नावाचे पहिले अक्षर छेदणे किंवा त्यावर रेषा ओढणे थांबवा. सही करताना नावाच्या पहिल्या अक्षरावर खाट येणार नाही, याची काळजी घ्या. तसं पाहायला गेल्यास सहीच्या कोणत्याच अक्षरांवर खाट मारली जाणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
गुरू असेल राजा, मंगळ मंत्री..! वर्ष 2026 मध्ये देशात या गोष्टींमध्ये वाढेल अराजक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
