या दिवशी काही वस्तू खरेदी करणे विशेषतः शुभ मानले जाते. कुटुंबातील सर्वजण, मुले विशेषतः धनत्रयोदशी-दिवाळीची आतुरतेने वाट पाहतात, कारण या दिवशी घरगुती खरेदी केली जाते. धनत्रयोदशीबाबत काही नियम पाळणे गरजेचे आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी काही वस्तू कोणालाही उसन्या-उधार देऊ नयेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी प्रमुख चार वस्तू कोणालाही उधार देऊ नका - धनत्रयोदशीची तिथी खूप खास मानली जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केली जाते. या दिवशी कोणालाही उधार काही देऊ नये. संध्याकाळच्या पूजेनंतर कोणालाही उधार देऊ नका. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धीचे नुकसान होऊ शकते.
advertisement
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कोणाला साखर देऊ नका. साखर देवी लक्ष्मीशी संबंधित असल्याचे म्हटले जाते. देवी लक्ष्मीला ऊस खूप आवडतो. म्हणून, धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुमच्या घरातून साखर बाहेर जाऊ देऊ नका.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
मीठ ही स्वयंपाकघरातील आणखी एक महत्त्वाची वस्तू आहे, परंतु शास्त्रांमध्ये ती संपत्तीशी संबंधित आहे. कोणी धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तुमच्याकडे मीठ मागितल्यास देण्यास नकार द्या. मीठ हे समुद्रातील उत्पादन आहे आणि देवी लक्ष्मी आणि समुद्राचा संबंध सर्वांना माहिती आहे. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मीठ उसने-उधार दिल्यानं तुमच्या घराच्या समृद्धीला बाधा येऊ शकते.
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी, दूध, दही, तेल किंवा सुया यासारख्या वस्तू उधार देणे टाळा. शिवाय, तुम्ही कोणालाही या वस्तू मागू नयेत. ज्योतिषी म्हणतात की असे केल्याने तुमच्या ग्रहांच्या स्थितीमध्ये व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)