धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, पण त्याचबरोबर काही नियमांचे पालन करणे देखील आवश्यक असते. जर या नियमांचे पालन केले, तर धन-संबंधी त्रासांपासून आपण दूर राहू शकतो. धनत्रयोदशीच्या रात्री कोणत्या चुका करणे टाळावे, ते जाणून घेऊया.
धनत्रयोदशीच्या रात्री टाळायच्या गोष्टी -
1. धन (पैसे)
धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उसने देऊ नका, विशेषतः पूजेच्या वेळी किंवा त्यानंतर. असे मानले जाते की, असे केल्यास लक्ष्मी देवी घरातून निघून जाते आणि घराची बरकत कमी होऊ शकते.
advertisement
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
साखर आणि गोड पदार्थ - धनत्रयोदशीच्या संध्याकाळी कोणालाही साखर किंवा गोड वस्तू उसने देऊ नयेत. उसाचा रस आणि मिठाई माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत. जर साखर बाहेर दिली गेली, तर माता लक्ष्मी रुसू शकते आणि घरातील धनाचा प्रवाह थांबण्याची शक्यता असते.
मीठ - मीठ समुद्रातून मिळते आणि त्याचा संबंध माता लक्ष्मीशी मानला जातो. धनत्रयोदशीच्या संध्याकाळी मीठ उसने दिल्यास, घरात सुबत्ता कमी होऊ शकते आणि पैशांची चणचण येण्याची शक्यता वाढते.
दूध आणि दही - धनत्रयोदशीच्या रात्री दूध आणि दही यांसारख्या वस्तू उसने देणे टाळावे. या गोष्टी घरातून बाहेर जाणे शुभ मानले जात नाही आणि यामुळे ग्रहांची स्थिती प्रभावित होऊ शकते.
तेल, सुई आणि इतर घरगुती वस्तू -
धनत्रयोदशीच्या संध्याकाळी तेल, सुई किंवा इतर उपयोगी वस्तू उसने देऊ नका. असं केल्यानं जीवनातील अडचणी वाढू शकतात आणि शुभ फळांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या नियमांचे पालन करून तुम्ही धनत्रयोदशीचा सण साजरा केल्यास, तुमच्या घरात माता लक्ष्मीची कृपा कायम राहील आणि आर्थिक अडचणी दूर होतील, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)