तुपाचा दिवा - हिंदू रितीरिवाजांमध्ये शुद्ध तुपाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे. दिवाळीच्या पूजेत, तुपाचा दिवा लावण्याचे महत्त्व आणखी वाढते. पूजेत तुपाचा दिवा लावल्याने देव लवकर प्रसन्न होतात. त्याचप्रमाणे, दिवाळीत भेसळ नसलेल्या शुद्ध तुपाचा दिवा लावून जर माता लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा केली, तर जीवनातील सर्व समस्यांचा अंत होऊ शकतो. शुद्ध तुपाचा दिवा लावून दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला घरात आमंत्रित केले जाते, ज्यामुळे माता लक्ष्मी घरात आनंदानं प्रवेश करते आणि सुख-समृद्धीचा आशीर्वाद देते. गणरायाची जीवनातील प्रत्येक वळणावर साथ मिळते. अशा प्रकारे, दिवाळीच्या मुहूर्तावर तुपाचा दिवा लावणं अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे घरात सकारात्मकता टिकून राहते आणि पैशांची कमतरता जाणवत नाही.
advertisement
दिवाळीच्या आनंदात एक गोष्ट विसरू नका! नरक चतुर्दशीला यमतर्पण करण्याचं महत्त्व
तेलाचा दिवा - दिवाळीत घराच्या कानाकोपऱ्यात जो दिवा लावला जातो, तो बहुतेक वेळा तेलाचा दिवा असतो. ज्या लोकांची संपूर्ण घरात तुपाचे दिवे लावण्याची क्षमता नसते, ते लोक तेलाचा दिवा लावून दिवाळी साजरी करतात. तसेच, अनेक घरांमध्ये तेल-दिवा सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे लावला जातो. हे तेल तीळ, शेंगदाणा, सोयाबीन किंवा मोहरीचे असू शकते. तेल कशाचे असेल हे देखील कोणत्या देवतेची पूजा केली जात आहे यावर अवलंबून असते, त्यानुसार देखील तेलाचे दिवे लावले जातात. मोहरीच्या तेलाने शनीदेव प्रसन्न होतात, त्याचप्रमाणे दिवाळीत या तेलाचा दिवा लावल्यास घरात कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही. तेलाचा दिवा लावल्याने घराचे संरक्षण वाढते आणि घराचे शुद्धीकरण होते. दिवाळीत लांब लाल वातीचा वापर करून तेलाचे दिवे लावल्यास जीवनावर शुभ प्रभाव पडतो.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)