एकादशीचे व्रत कधी सुरू करायचे?
एकादशीचे व्रत सुरू करू इच्छिणाऱ्यांनी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला सुरुवात करावी. म्हणजेच उत्त्पत्ती एकादशीपासून एकादशीचं व्रत-उपवास करण्यास सुरुवात करावी.
एकादशी व्रत सुरू करण्याची शुभ तारीख -
यावर्षी उत्त्पत्ती एकादशी शनिवार, 15 नोव्हेंबर रोजी आहे. कॅलेंडरनुसार, कार्तिक कृष्ण एकादशी तिथी 15 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 12:49 ते 16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री 02:37 पर्यंत आहे. तुम्ही 15 नोव्हेंबर 2025 पासून एकादशी व्रत सुरू करू शकता. हा एक अतिशय शुभ दिवस आहे.
advertisement
उत्त्पत्ती एकादशीपासून एकादशी व्रत का सुरू करावं?
पुराणानुसार, देवीने कार्तिक एकादशी तिथीला जन्म घेतला आणि मुरा राक्षसापासून भगवान विष्णूंचे रक्षण केले. मुरा देवीने मारला. यावर प्रसन्न होऊन भगवान विष्णूने देवीला सांगितले की, तिचा जन्म एकादशीला झाला असल्याने, तिची पूजा एकादशीलाही केली जाईल. या एकादशीला उत्पन्न एकादशी असे म्हटले जाईल.
या कारणास्तव, उत्त्पत्ती एकादशीला एकादशी व्रत सुरू करणे शुभ मानले जाते. उत्पन्न एकादशी व्यतिरिक्त, तुम्ही चैत्र, वैशाख आणि माघ या एकादशीलाही एकादशी व्रत सुरू करू शकता.
एकादशी व्रताचे नियम -
एकादशी व्रत सुरू करणाऱ्यांनी दोन दिवस आधीपासून सात्विक आहार घ्यावा. त्यांनी मांस, मद्य, लसूण आणि कांदे वर्ज्य करावेत.
तामसिक पदार्थ टाळावेत.
एकादशी व्रताच्या दिवशी सकाळी स्नान करून उपवास करण्याची, विष्णूची पूजा करण्याची प्रतिज्ञा करावी. शुभ काळात भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा केली जाते. त्या वेळी एकादशी व्रताची कथा ऐकणे देखील गरजेचे आहे.
एकादशीचं व्रत करणाऱ्यांनी ब्रह्मचर्य नियमांचे पालन केले पाहिजे.
एकादशी व्रताच्या दिवशी दिवसभर फळे खावीत; धान्य खाण्यास मनाई आहे. पाणी पिण्यास कोणतेही बंधन नाही.
एकादशीच्या रात्री शक्य असल्यास जागरण करावे. जागरण भजन, कीर्तन आणि देवतेचे नाव जपणे शुभ.
हरि वासरनंतर द्वादशी तिथीला एकादशी व्रत सोडले जाते.
एकादशी व्रत सोडण्यापूर्वी आपल्या क्षमतेनुसार एखाद्या ब्राह्मणाला अन्न, कपडे, फळे इत्यादी दान करावेत.
पूर्ण 12 महिने म्हणजे 24 एकादशी एकादशीचे व्रत ठेवू शकता. त्यानंतर, तुम्ही एकादशी व्रताचे उद्यापन (पूर्णता) करू शकता. करण्याची तयारी असल्यास 3, 5, 7 किंवा 11 वर्षे एकादशीचं व्रत करू शकता.
काही लोक आयुष्यभर एकादशी व्रत पाळतात आणि जेव्हा त्यांचे शरीर थकतं, तेव्हा दैवी परवानगीने उद्यापन (पूर्णता) करतात.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
