जिवंतिका पूजेचे महत्त्व - संततीसाठी केले जाणारे हे एक महत्त्वाचे व्रत आहे. हे व्रत आई आपल्या मुलांसाठी करते (वडिलसुद्धा करू शकतात). जिवंतिका देवीला बालकांचे रक्षण करणारी देवी मानले जाते, ज्यामुळे मुले निरोगी आणि दीर्घायुषी होतात, असे मानले जाते.
एका पौराणिक कथेनुसार, 'जरा' नावाची एक राक्षसीण होती जिने दोन तुकड्यांमध्ये जन्माला आलेल्या एका बालकाला एकत्र जोडून त्याला जीवदान दिले. त्यामुळे त्या बालकाला जरासंध असे नाव पडले आणि तेव्हापासून जरा ही बालकांचे रक्षण करणारी देवी म्हणून पूजली जाऊ लागली. श्रावणातील प्रत्येक शुक्रवार हा जिवंतिका पूजनासाठी समर्पित असतो. या दिवशी कुलदेवी आणि लक्ष्मी मातेची पूजा करणेही शुभ मानले जाते.
advertisement
पूजेची पद्धत आणि साहित्य -
जिवंतिका देवीची पूजा करण्याची पद्धत सोपी आहे. तुम्ही जिवंतिकेची प्रतिमा (कागदावर छापलेली) भिंतीवर लावून पूजा करू शकता. पूजेसाठी जिवतीची प्रतिमा/फोटो, फुलं, हळद-कुंकू, अक्षता. आघाड्याची पाने, दूर्वा (यांची माळ करून देवीला अर्पण करावी). २१ मण्यांचे कापसाचे गेजवस्त्र. धूप, दीप, निरांजन. नैवेद्य (साखरेचा नैवेद्य, चणे-फुटाणे किंवा पुरण-वरणाचा नैवेद्य).
दुग्धशर्करा! श्रावणात अंगारकी संकष्टीचा योगायोग; वर्षभर संकष्टी करण्यात इतकं फळ
पूजा विधी: श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच जिवतीची प्रतिमा देवघराजवळ किंवा भिंतीवर लावावी. प्रत्येक शुक्रवारी प्रतिमेची गंध, हळद-कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करावी. तयार केलेला नैवेद्य देवीला अर्पण करून आरती करावी. पूजा झाल्यानंतर घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. जर मुले बाहेरगावी असतील, तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात. या दिवशी महिला उपवास करतात आणि सायंकाळी नैवेद्य घेऊन उपवास सोडतात.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)