आज काल प्रत्येकाच्या घरात फ्रीजसह विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात, या गोष्टी आता आजच्या धावपळीच्या काळात गरज बनली आहेत. वास्तुशास्त्रात फ्रीजच्याबाबतीत काही नियम देखील सांगितले आहेत.
फळे, भाज्या आणि इतर अन्नपदार्थ दीर्घकाळ ताजे आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सामान्यतः फ्रीजचा वापर केला जातो. पण, बरेच लोक फ्रीजच्यावर विविध वस्तू देखील ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार तसं करणं खूप चुकीचं मानलं जातं. फ्रीजच्या वर ठेवलेल्या काही वस्तू नकारात्मकता वेगाने वाढवतात, ज्यामुळे वास्तु दोष होऊ शकतात. म्हणून, फ्रीजच्यावर कोणत्या वस्तू ठेवणे टाळावे, याविषयी जाणून घेऊ.
advertisement
फ्रीजच्या वर या वस्तू ठेवणे टाळा -
पाण्याच्या घटकाशी संबंधित गोष्टी - वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, फ्रीज अग्नी घटकाचे प्रतीक आहे. म्हणून त्याच्या वर पाण्याच्या घटकाशी संबंधित वस्तू ठेवल्याने आर्थिक नुकसान, संघर्ष आणि कौटुंबिक तणाव वाढू शकतो. म्हणून, फ्रीजच्या वरच्या पृष्ठभागावर फिश अॅक्वेरियम, पाणी साचलेले रोपांच्या कुंड्या, मनी प्लांट्स ठेवणे टाळा.
औषधे - वास्तुशास्त्रानुसार, फ्रीजच्या वरच्या पृष्ठभागावर औषधे ठेवू नयेत. यामुळे आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. शिवाय, अशी अनेक औषधे उष्ण वातावरणात ठेवणं टाळलं पाहिजे. फ्रीजच्या वरचा पृष्ठभाग गरम असतो, ज्यामुळे औषधे खराब होऊ शकतात. म्हणून फ्रीजच्या वर औषधे ठेवणे टाळा. काही औषधे कमी तापमानात ठेवण्याची शिफारस केली जाते. ती फ्रीजच्या आत ठेवायला हरकत नाही.
धनु मकर कुंभ मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; अस्तित्वाचा प्रश्न सुटणार, धनलाभ
लहान-सहान वस्तू - अनेक घरांमध्ये लोक लहान आणि मोठ्या निरुपयोगी वस्तू थेट फ्रीजच्या वर आणून ठेवतात. वास्तुशास्त्रात ही एक अतिशय चुकीची पद्धत आहे. जुन्या, खराब झालेल्या किंवा वापरात नसलेल्या वस्तू फ्रीजच्या वर ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते आणि घराच्या सुख-समृद्धीला बाधा येऊ शकते.
याशिवाय, फ्रीजच्या वर देवांच्या मूर्ती किंवा फोटो, बांबूची झाडे, पैसे, जड वस्तू, ओव्हन, मोबाईल चार्जर, धान्याचे बॉक्स, ट्रॉफी आणि पुरस्कार ठेवणे देखील टाळावे. घरात शांतता आणि सकारात्मकता राखण्यासाठी, रेफ्रिजरेटर सजवण्यासाठी फक्त हलक्या रंगाच्या वस्तू वापरा.
तडफ-तडफके..! जरा नव्हे तब्बल 8 महिने या राशीच्या लोकांना खडतर काळ सोसावा लागेल
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
