शुभमन गिलचा जन्म 8 सप्टेंबर 1999 रोजी झाला होता आणि त्याची राशी कर्क आणि नक्षत्र आश्लेषा आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 1993 रोजी जन्मलेल्या हार्दिक पांड्याचीही रास कर्क आणि नक्षत्र आश्लेषा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ही जन्मरास आणि नक्षत्र असल्यास असे लोक त्यांच्या जीवनात खूप यशस्वी होतात. अशी माणसं जे काही ठरवतात ते ते साध्य करतात. या दोन्ही खेळाडूंमध्ये हे गुण स्पष्टपणे दिसून येतात.
advertisement
कर्क रास आणि आश्लेषा नक्षत्रात जन्मलेले लोक कसे असतात?
या राशी आणि नक्षत्रावर जन्मलेले लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या भक्कम असतात. हे लोक हुशार आणि विचारशील असतात. ते प्रत्येक काम विचारपूर्वक करतात, ही सवय त्यांना यशस्वी मार्गावर पुढे नेत असते. या लोकांचा स्वभाव स्वतंत्र असतो, इतरांशी बोलण्यात आणि वागण्यात ते चांगले असतात. शिवाय कधी-कधी हे थोडे हट्टी देखील बनतात आणि जे करायचे ठरवले आहे ते पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीत. या लोकांमधील खराब गुण म्हणजे त्यांच्यातील आक्रमक स्वभाव. या रास आणि नक्षत्राची माणसं व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्रात तेजस्वीपणे चमकतात.
बलस्थानं कोणती असतात - आश्लेषा हे जन्म नक्षत्र असलेली माणसं मैत्री चांगली निभावतात. हे लोक कोणतंही काम प्रामाणिकपणे करतात. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते जीवनातील आव्हानांचा अंदाज घेऊन लगेच सतर्क होतात. या राशी-नक्षत्राचे लोक कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवत नाहीत, म्हणूनच त्यांची फसवणूक क्वचितच होते. या लोकांमध्ये बोलण्याची कला उत्तम असते, ज्यामुळे ते सहजपणे एखाद्याचं मन वळवतात. हे लोक त्यांच्या निश्चयावर ठाम असतात. अत्यंत मेहनती असल्यानं ते त्यांच्या प्रत्येक कामात यश मिळवू शकतात.
वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
