करिअरमध्ये नवीन संधी आणि प्रगतीसाठी उत्तर दिशा अत्यंत शुभ मानली जाते. तुमचे कार्यस्थान (ऑफिस किंवा अभ्यास करण्याची जागा) शक्य असल्यास उत्तर दिशेला ठेवावे. काम करताना किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना तुमचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो. काम करताना तुमची पाठ भिंतीकडे असावी, म्हणजे तुम्हाला योग्य पाठिंबा आणि स्थिरता मिळते. दरवाजाकडे पाठ करून बसू नका.
advertisement
तुमचा डेस्क व्यवस्थित आणि स्वच्छ असावा. त्यावर अनावश्यक कागदपत्रे किंवा जुने सामान ठेवू नका. डेस्कावर स्फटिक (Crystal) किंवा बांबूचे रोप ठेवल्यास कामात उत्साह वाढतो. कामाच्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असावा. अंधुक प्रकाशामुळे आळस येतो आणि कामात अडथळे येतात. शक्य असल्यास, नैसर्गिक प्रकाशाचा उपयोग करा.
फेंगशुईमध्ये लाफिंग बुद्धाची मूर्ती शुभ मानली जाते. असं मानलं जातं की ही मूर्ती घरात आणि ऑफिसमध्ये आनंद, समृद्धी आणि संपत्ती आकर्षित करते. जर तुमचं कामाचं ठिकाण तणावपूर्ण असेल आणि प्रगतीत अडथळा येत असेल, तर लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवल्याने सकारात्मक बदल होऊ शकतात. ही मूर्ती केवळ तुमचं ऑफिस प्रसन्न बनवते, तर तुम्हाला मानसिक शांती आणि आत्मविश्वासही देते.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
फेंगशुईमध्ये कासव दीर्घायुष्य आणि यशाचं प्रतीक मानलं जातं. जर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यशाकडे वाटचाल करायची असेल, तर तुम्ही पितळेचा कासव ठेवू शकता. हे तुमच्या जीवनात प्रगती आणि स्थिरता आणतं. पाण्याने भरलेल्या भांड्यात ठेवणं विशेष फायदेशीर मानलं जातं.
विंड चाइमचा उपयोग वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. फेंगशुईनुसार, ऑफिसच्या खिडकीजवळ ते टांगणं खूप शुभ मानलं जातं. यातील संगीतामुळे वातावरण ताजेतवाने राहतं आणि संपत्ती आकर्षित करण्यासही मदत होते. याशिवाय, ते वास्तू दोषही दूर करतं.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)