कुबेर यंत्र - शास्त्रानुसार कुबेर महाराजांना स्वर्गलोकाचे कोषाध्यक्ष मानले जाते. म्हणजेच स्वर्गातील धन-धान्य आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व गोष्टी त्यांच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे, ज्योतिष तज्ञांच्या मते, धनत्रयोदशीच्या दिवशी घरात कुबेर यंत्राची स्थापना करणे खूप शुभ आणि मंगलकारी असते. वास्तुशास्त्रानुसार, धनत्रयोदशीच्या रात्री भगवान कुबेर यांची पूजा-अर्चा करावी. त्यानंतर 'ॐ श्री ॐ ह्रीं श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः' या मंत्राचा जप करत घराच्या उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना करावी.
advertisement
धनत्रयोदशीच्या रात्री कुबेर यंत्र उत्तर दिशेलाच राहू द्यावे. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी ते काळजीपूर्वक मंदिरात ठेवावे किंवा घरात जिथे धन ठेवले जाते त्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवावे. जर तुम्ही व्यापारी असाल आणि दुकान चालवत असाल, तर ते गल्ल्यात ठेवणे देखील उत्तम राहील. ज्योतिष तज्ञ म्हणतात की, घरात कुबेर यंत्राची स्थापना केल्यानं कधीही आर्थिक टंचाई येत नाही. अशा घरात कधीही धनाची कमतरता भासत नाही. अशी माणसे नेहमी पैशात खेळतात.
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
कुबेर महाराजांची मूर्ती - धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर महाराजांची मूर्ती देखील घरी आणू शकता. घरात मूर्तीची स्थापना अशा प्रकारे करा की भगवान कुबेर यांचे मुख उत्तर दिशेकडे असेल. किंवा भगवान कुबेर यांचा चेहरा मुख्य प्रवेशद्वाराकडे असावा, जेणेकरून घरात प्रवेश करताच त्यांची दृष्टी थेट तुमच्यावर पडेल. ज्योतिष तज्ञ म्हणतात की, घरात पितळ, कांस्य किंवा अष्टधातूपासून बनवलेली कुबेर महाराजांची मूर्ती शुभ फळ देते, असे मानले जाते.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)