TRENDING:

Lucky Flower: तुमचं लकी फुल माहीत आहे? जन्मतारखेच्या महिन्यानुसार या रंगाची फुलं शुभ

Last Updated:

Lucky Flower: वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्म महिन्यानुसार विशिष्ट फुलाचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण एखाद्याला त्याच्या जन्म महिन्यानुसार फुले देऊ शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 02 फेब्रुवारी : कोणत्या रंगाचे फूल कोणत्या देवाला अर्पण करावे, याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. पण आज आपण मानवांसाठी भाग्यवान फुलांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्योतिषी आचार्य आलोक पंड्या मानवाशी संबंधित लकी फुलांविषयी सांगत आहेत. वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या जन्म महिन्यानुसार विशिष्ट फुलाचा उल्लेख करण्यात आला आहे. आपण एखाद्याला त्याच्या जन्म महिन्यानुसार फुले देऊ शकता. जाणून घेऊया कोणत्या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीचा संबंध कोणत्या रंगाच्या फुलाशी आहे.
News18
News18
advertisement

जन्म महिन्यानुसार फुले -

जानेवारी - जानेवारीत जन्मलेली मुले बुद्धिमान आणि शांत स्वभावाची मानली जातात. या महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी पांढरी आणि गुलाबी रंगाची फुले भाग्यवान मानली जातात.

फेब्रुवारी - फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या व्यक्तींना गुलाबाचे फूल द्यावे. अशा लोकांसाठी ते शुभ मानले जाते. तुम्ही त्यांना लाल, गुलाबी, पांढरे आणि पिवळ्या रंगाचे गुलाब देऊ शकता.

advertisement

मार्च -मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी चमेलीचे फूल भाग्यवान मानले जाते. असे म्हटले जाते की यामुळे मैत्री घट्ट होते आणि नातेसंबंध मजबूत राहतात.

एप्रिल - एप्रिल महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी जास्वंदीचे फूल भाग्यवान मानले जाते. असे मानले जाते की हे फूल दिल्याने जीवनात आनंद मिळतो.

मे - मे महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी पांढरी फुले भाग्यवान असतात. पांढऱ्या फुलांना जीवनातील शांतीचे प्रतीक मानले जाते.

advertisement

जून - जून महिन्यात जन्मलेल्यांसाठी गुलाबाचे फूल भाग्यवान मानले जाते. असे म्हटले जाते की, या महिन्यात जन्मलेल्यांना लाल फुले दिल्यास त्यांच्या जीवनात प्रेमात संघर्ष होत नाही.

हर हर शंभू..! फेब्रुवारीचं पहिलं प्रदोष व्रत कधी? शिव पूजा, रुद्राभिषेक मुहूर्त

जुलै - जुलै महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी चाफा फुल खूप भाग्यवान मानले जाते. चाफा फुल त्यांच्या आयुष्यात आनंद आणते.

advertisement

ऑगस्ट - ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी पिवळ्या रंगाची फुले खूप भाग्यवान मानली जातात. या फुलाचा संबंध प्रगतीशी आहे.

सप्टेंबर - सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी लाल फुले खूप भाग्यवान मानली जातात. या लोकांना लाल फुले द्यावीत.

ऑक्टोबर - ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी शेवंतीचे फूल भाग्यवान मानले जाते. हे फूल एखाद्या व्यक्तीच्या करिअरसाठी उपयुक्त आहे.

advertisement

नोव्हेंबर - नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांसाठी हिरव्या रंगाची फुले भाग्यवान मानली जातात. असे म्हटले जाते की, हिरव्या रंगामुळे त्यांना गणेशाची कृपा आहे.

डिसेंबर - डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांसाठी सूर्यफूल खूप भाग्यवान मानले जाते. अशा लोकांना सूर्यफुलाची द्यावीत. यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.

प्रपोज करण्यात पटाईत असतात या जन्मतारखांचे लोक! घरीही बिनधास्त सांगतात

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Lucky Flower: तुमचं लकी फुल माहीत आहे? जन्मतारखेच्या महिन्यानुसार या रंगाची फुलं शुभ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल