मकर संक्रांतीच्या दिवशी सहा शुभ योग - पहिला वृद्धी योग आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी हा योग असल्यामुळे या काळात केलेले स्नान, दान आणि इतर शुभ कार्यांचे पुण्य अधिक वाढते. जे काही चांगले कर्म केले जाईल त्याचे फळ दुपटीने मिळते असे मानले जाते. दुसरा ध्रुव योग आहे. हा योग मकर संक्रांतीच्या रात्री तयार होतो. हा देखील शुभ योग मानला जातो. या काळात पूजा, जप, दान किंवा कोणतेही चांगले कार्य करणे लाभदायक ठरते. तिसरे ज्येष्ठा नक्षत्र आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पूर्ण वेळ ज्येष्ठा नक्षत्र राहील. या नक्षत्राचे स्वामी बुध ग्रह असून देवता इंद्र आहेत. हे नक्षत्र बुद्धी, नेतृत्व आणि सामर्थ्य दर्शवते. मकर संक्रांतीच्या दिवशी ज्यांनी षट्तिला एकादशीचे व्रत केले आहे ते सूर्योदयानंतर स्नान-दान करून पारण करतील. त्यामुळे त्यांना विशेष पुण्य लाभेल. मकर संक्रांती गुरुवारी येत असल्याने या दिवशी भगवान विष्णूंची कृपा मिळते, असे मानले जाते. सूर्यदेवांची पूजा करताना विष्णूंचीही आराधना केल्यास अधिक पुण्य मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी माघ महिन्यातील कृष्ण द्वादशी तिथी असते. या दिवशी पितरांसाठी तर्पण आणि दान केले जाते. विशेषतः तिळाचे दान केल्याने पितर प्रसन्न होतात अशी श्रद्धा आहे.
advertisement
मकरसंक्रातीनंतर सुवर्णयुगाची सुरुवात; शनिच्या घरात सूर्याची एंट्री 4 राशींना लकी
यावर्षीच्या मकर संक्रांतीचे नाव मंदाकिनी आहे. या दिवशी सूर्यदेव पिवळ्या रंगाची वस्त्रे परिधान करून वाघावर स्वार होतील. त्यांचे उपवाहन घोडा असेल. ते ईशान्य दिशेकडे पाहत पश्चिम दिशेकडे गमन करतील. या दिवशी त्यांचे अस्त्र गदा असून ते भोग अवस्थेत असतील. चांदीच्या भांड्यातील पायस म्हणजेच खीर हे त्यांचे भोजन मानले जाते.
या मकर संक्रांतीचा प्रभाव लोकांच्या आरोग्यावर चांगला पडणारा असेल. आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे. संक्रांतीनंतर देशोदेशींच्या संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. सूर्यदेवांच्या कृपेने घराघरात धन-धान्य वाढेल, अशी आशा आहे. सरकारी नोकरी करणारे किंवा सरकारशी संबंधित काम करणाऱ्यांसाठी ही संक्रांती शुभ ठरू शकते. मात्र काही लोकांना आपल्या भविष्याबद्दल चिंता वाटू शकते किंवा मनात भीती निर्माण होऊ शकते.
टेन्शन सोडा, इतक्या सहज होणार काम; मकर संक्रातीच्या आधीच या राशींना शुभवार्ता
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
