माणिक्य धारण करण्याचे 5 मोठे फायदे
आत्मविश्वासात वाढ - माणिक्य परिधान केल्यानं व्यक्तीच्या आत्मविश्वासात आणि आत्मसन्मानात वाढ होते. ज्या लोकांमध्ये आत्म-संशय किंवा आत्ममूल्याची कमतरता असते, त्यांच्यासाठी हे रत्न अत्यंत लाभदायी ठरते. ते मनोबल वाढवून व्यक्तीस नेतृत्व क्षमता मिळवून देतं.
धन आणि समृद्धीमध्ये वाढ - हे रत्न जीवनात सुख, समृद्धी आणि आर्थिक स्थिरता आणते. माणिक्य धारण केल्यानं करिअरमध्ये प्रगती आणि व्यवसायात यशाचे योग तयार होतात. या रत्नामुळे आर्थिक समस्यांपासून दिलासा मिळतो.
advertisement
तणाव आणि नैराश्यात घट - माणिक्य मनाला स्थिर ठेवून नकारात्मक विचार दूर करू लागते. हे रत्न मानसिक ताण कमी करण्यास सहायक ठरते आणि नैराश्याने त्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर मानले जाते.
आरोग्यात सुधारणा - रत्नशास्त्रानुसार, माणिक्य रत्न हृदय, डोळे आणि पचनाशी संबंधित समस्यांमध्ये लाभ पोहोचवते. हे शरीरातील ऊर्जेचे संतुलन राखते आणि रोगप्रतिकारशक्ती चांगली करते.
जे लोक कला, संगीत, लेखन किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांच्यासाठी माणिक्य अत्यंत शुभ असते. ते धारण केल्यानं विचारात स्पष्टता येते आणि नवीन कल्पनांची प्रेरणा मिळते.
कोणत्या राशींसाठी आहे शुभ -
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष, सिंह आणि धनु राशीच्या व्यक्तींसाठी माणिक्य परिधान करणे अत्यंत शुभ ठरते. तर कर्क आणि मीन राशीच्या लोकांनी केवळ अनुभवी ज्योतिषाचार्याच्या सल्ल्यानंतरच ते धारण करावे. मकर, कन्या, तूळ, मिथुन आणि कुंभ राशीच्या लोकांनी माणिक्य घालणे टाळावे, कारण ते त्यांच्यासाठी प्रतिकूल परिणाम देऊ शकते.
माणिक्य धारण करण्याची पद्धत - माणिक्य धारण करण्यापूर्वी ते गंगाजलाने शुद्ध करावे. रविवारच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी ॐ ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः मंत्राचा जप करत, सोन्याच्या अंगठीत उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये (करंगळीजवळील बोट) ते परिधान करणे शुभ मानले जाते.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)