धनत्रयोदशीला नवीन भांडी आणि सोने-चांदीची नाणी खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी केलेली खरेदी धन-धान्यात वाढ करते आणि घरात समृद्धी आणते, असं मानलं जातं. या व्यतिरिक्त, धनत्रयोदशीला झाडू (केरसुणी) खरेदी करण्याची देखील खास परंपरा आहे. जर तुम्ही या धनत्रयोदशीला झाडू खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींची काळजी घेणं चांगलं राहील.
advertisement
झाडू खरेदी करण्याची शुभ वेळ - धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. या दिवशी खरेदी केलेला झाडू खजुरीच्या पानांपासून किंवा गवत-काड्यांपासून बनलेला असावा. सकाळची वेळ झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मानली जाते. या वेळेत खरेदी केलेला झाडू घरात समृद्धी आणतो, अशी मान्यता आहे. तर, सूर्यास्तानंतर झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. धनत्रयोदशीला प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम सामग्रीपासून बनलेला झाडू खरेदी करू नये.
जन्मतारखेचाच तो गुण आहे! या मूलांकावर जन्मलेल्या मुली जास्तच अॅटिट्यूड दाखवतात
झाडू ठेवण्याची योग्य दिशा - वास्तुशास्त्रानुसार झाडू योग्य दिशेला ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. तो नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) किंवा पश्चिम दिशेला ठेवल्यास घरात सुख-समृद्धी येते. झाडू पूर्व दिशेला ठेवणे टाळले पाहिजे, कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा (Negative Energy) येऊ शकते आणि वास्तु दोष निर्माण होऊ शकतो. धनत्रयोदशीला खरेदी केलेला किंवा झाडू मुख्य दरवाज्याजवळ किंवा पूजाघराजवळ ठेवू नये. योग्य दिशेला ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि समृद्धीचा मार्ग खुले होतात.
यंदाची धनत्रयोदशी टर्निंग पॉईंट! तूळ, मकर, कर्क राशींच्या लोकांनी आता तयारीत रहा
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)