गरुड पुराणात याविषयी सांगितलं आहे की, मृताच्या वस्तू वापरल्यानं जीवनात नकारात्मक प्रभाव वाढतो. असं केल्यानं पितृदोषाचा धोका वाढतो. पितृदोष एखाद्या व्यक्तीचे सुख नष्ट करू शकतो आणि श्रीमंत व्यक्तीलाही गरीब बनवू शकतो. मृताच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत याबाबत आज जाणून घेऊया.
मृताचे कपडे - मृताचे कपडे घालणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की मृताची ऊर्जा कपड्यांमध्ये जिवंत राहते, ज्याचा वापर इतरांनी केल्यास प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. मृतांचे कपडे वापरल्यानं मानसिक ताण किंवा आजार होऊ शकतात.
advertisement
दागिने - मृताचे दागिने कितीही मौल्यवान असले तरी ते नेहमी वापरणं योग्य नाही. शरीराने स्पर्श केल्यावर दागिने एक प्रकारची ऊर्जा टिकवून धरतात. जेव्हा या वस्तू दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येतात तेव्हा या उर्जेचा त्यांच्या नशिबावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून, त्यांना वारसा म्हणून जतन करणे योग्य ठरेल.
1, 10, 19, 28 तारखेला जन्म झाला असल्यास बाळाचं नाव या अक्षरानं बिलकूल ठेवू नका
घड्याळ - मृत व्यक्तीचे घड्याळ घरातील दुसऱ्या कोणी घालणं देखील अयोग्य मानलं जातं. असं केल्यानं मृत व्यक्तीचा अपूर्ण काळ त्याच्या स्वतःच्या घड्याळाशी जोडला जातो असे मानले जाते. यामुळे जीवनात अडचणी, विलंब किंवा दुर्दैवी गोष्टी घडू शकतात.
बूट-चपला - बूट-चपलांचा पृथ्वी तत्वाशी सर्वात जवळचा संबंध आहे, म्हणून असे म्हटले जाते की मृत व्यक्तीचे बूट कधीही घालू नयेत. असे केल्याने घरात दुःख, गरिबी आणि नकारात्मकता येते.
भांडी - मृत व्यक्तीनं वापरलेली भांडी देखील घरात ठेवू नयेत. असं मानलं जातं की ही भांडी मृत व्यक्तीच्या अन्नाची सूक्ष्म ऊर्जा टिकवून ठेवतात, ज्यामुळे हळूहळू दुर्दैव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.
भाग्याेदयाची वेळ आता आलीय! 28 नोव्हेंबरपासून 5 राशींना शनीकडून मोलाची साथ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
