रोज क्वार्ट्ज स्टोन (Rose Quartz Stone) -
गुलाबी रंगाचे रोज क्वार्ट्ज स्टोन प्रेम संबंधांसाठी जणू औषधाप्रमाणे काम करतं. नात्यातून सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि प्रेम व रोमान्स वाढायला लागतो. तुम्ही रोज क्वार्ट्जचा तुकडा जवळ ठेवू शकता, अंगठी किंवा गळ्यात धारण करू शकता. हे रत्न धारण केल्याने नात्यात आदर वाढतो.
advertisement
गार्नेट (रक्तमणी - Garnet) -
गडद लाल रंगाचा गार्नेट स्टोन उत्साह आणि विश्वासाचा कारक आहे. नात्यात प्रेम वाढवण्यासाठी आणि ते जागृत ठेवण्यासाठी गार्नेट खूप प्रभावीपणे काम करतं. नात्यात रोमांच कायम राहतो. कपलला नात्यात त्यांना काय हवं आहे आणि नातं कसं सुधारता येईल, हे समजून घेता येतं. जोडीदारांमध्ये नात्यात मजबूती आणि विश्वास वाढतो.
सिट्रीन (सुनहला रत्न - Citrine Stone) -
पिवळ्या रंगाचे सिट्रीन स्टोन (सुनहला रत्न) धारण केल्याने नात्यात सकारात्मकता येते आणि आनंद वाढतो. लव्ह लाईफमध्ये ऊर्जेचा संचार होतो. हे रत्न घरातही सुख-समृद्धी आणतं. सिट्रीन रत्न नात्याला खोलवर नेतं आणि आत्मविश्वास वाढवतं. नात्यात येणारी आव्हाने दूर होतात आणि शांती टिकून राहते.
एमेथिस्ट (जमुनिया रत्न - Amethyst Stone) -
एमेथिस्ट स्टोन (जमुनिया रत्न) धारण केल्याने वैवाहिक जीवनात संतुलन येतं आणि भावनिक स्तरावर अधिक छान वाटू लागतं. एमेथिस्ट म्हणजेच जमुनिया रत्न धारण केल्यानं नात्यात समजूतदारपणा वाढतो आणि गैरसमज दूर होतात. लव्ह लाईफ सुधारते आणि सुखात वाढ होते. शांती आणि आनंद येतो.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
