अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबरमधील प्रत्येक अंकात वेगळी शक्ती असते, ती आपल्या जीवनावर परिणाम दाखवते. आपल्या मोबाईल नंबरचा शेवटचा अंक खूप महत्त्वाचा मानला जातो. अनेकांच्या बाबतीत असं बऱ्याचदा घडतं की सुरुवात फार छान होते पण, शेवटी काम येऊन अडकतं, बोलणी बिघडतात, काम सुटतं.
अंकशास्त्रानुसार याचे कारण मोबाईल नंबरमध्ये असलेल्या काही विशेष संख्या कारण मानल्या जातात. मोबाईल नंबरचा शेवटचा आकडा लहान संख्या असेल. म्हणजे १, २, ३ असे तर बरीच कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन अडकू शकतात.
advertisement
अंकशास्त्रज्ञ अंशुल त्रिपाठी सांगतात, सहसा मोबाईल नंबर ८, ९, ७ किंवा ६ सारख्या मोठ्या संख्येने सुरू होणारे असतील तर त्यामुळे कामाच्या सुरुवातीला ऊर्जा आणि परिणाम चांगले असतात. पण जर शेवटी लहान संख्या (१, २, ३) असतील तर काम शेवटी येऊन अडकू शकते किंवा वारंवार अडचणी येऊ शकतात. त्यामुळे खूप कष्ट करूनही शेवटच्या टप्प्यावर अपयशाला तोंड द्यावं लागतं.
अंकशास्त्रानुसार, मोबाईल नंबरमधील प्रत्येक अंकाचे वेगळे महत्त्व असून त्याचा आपल्या कामावर, विचारांवर आणि निर्णयांवर देखील परिणाम होतो. मोबाईल नंबरचा शेवटचा अंक ६, ८ किंवा ९ सारखा मोठा अंक असल्यास कामाला ताकद आणि स्थिरता देण्यास मदत मिळते. यासोबतच, व्यक्तिची निर्णय घेण्याची स्थिरता आणण्याची आणि काम शेवटापर्यंत नेण्याची क्षमता असते.
समजा एखाद्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आहे: 9049XXXX३१. या नंबरमध्ये शेवटचा अंक १ आहे. तर या व्यक्तीला वारंवार कामे शेवटच्या टप्प्यात जाऊन अडकण्याचे अनुभव येतात. असे छोटे अंक त्यामागील कारण असू शकता. जर एखाद्याचा मोबाई क्रमांक 9049XXXX८९ असेल, तर हा क्रमांक स्थिरता आणि ताकद दर्शवितो. त्यामुळे आयुष्यात लवकर यश मिळू शकते.
गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात
उपाय काय करावा?
१. नवीन मोबाईल नंबर घेताना, शेवटच्या अंक पाहून घ्या.
२. मोबाईल नंबरचा शेवटचा अंक ६, ८ किंवा ९ असा मोठा क्रमांक असावा.
३. नंबर बदलणे शक्य नसेल, तर अंकशास्त्रज्ञाचा सल्ला घेऊन उपाय करावेत.
४. संख्येची एकूण बेरीज तुमचा मूलांक येते का पहा, भाग्यांकाशी जुळतोय का ते पाहावे.
आत्तापर्यंत चालून गेलं! वर्ष 2025 मधील शेवटचे 6 महिने या राशींसाठी खडतर, संकटे
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)