मूलांक ९ चे लोक कसे असतात - मूलांक ९ असलेले लोक साहसी, आत्मविश्वासी, अत्यंत प्रामाणिक आणि उत्साही असतात. मंगळाच्या ऊर्जेमुळे हे लोक कठीण काळातही शांत राहून परिस्थितीवर नियंत्रण मिळवतात. हे लोक संपूर्ण आयुष्य शिस्तबद्धतेने जगतात. आपल्या शब्दापासून आणि कोणालाही मदत करण्यापासून ते कधीही मागे हटत नाहीत. स्वभावाने खूप दयाळू आणि हारूनसुद्धा जिंकण्याची जिद्द ठेवणारे मूलांक ९ चे लोक असतात.
advertisement
मूलांक ९ साठी योग्य करिअर - मूलांक ९ च्या लोकांसाठी अनेक करिअर पर्याय उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, हे लोक संरक्षण (डिफेन्स) क्षेत्रात चांगले काम करतात. हे लोक चांगले सामाजिक कार्यकर्ते होऊ शकतात. जनहितार्थ कामे जसं की, वकील, डॉक्टर यांसारख्या व्यवसायांमध्ये हे लोक चांगले प्रदर्शन करतात. ९ नंबरच्या लोकांसाठी खेळ (स्पोर्ट्स) क्षेत्रात काम करणं देखील यशस्वी करिअरचा पर्याय असू शकतं. हे धैर्यवान लोक नेतृत्व करण्यात अग्रेसर असतात.
मंगळ वाईटपणे मागे लागलेला! ऑक्टोबरच्या शेवटी या 5 राशींची परिस्थिती पालटणार
मूलांक ९ च्या लोकांचे प्रेम जीवन - मूलांक ९ च्या लोकांचं प्रेम जीवन तसं उथळ-पुथळ (अस्थिर) असतं, पण हे लोक आपल्या जोडीदाराशी खूप वफादार असतात. आपल्या प्रियकरासाठी हे ९ मूलांकाचे लोक काहीही करण्यास तयार असतात आणि समर्पित राहतात. त्यांच्या नात्यात खोलवर आणि स्थायित्व असतं. हे लोक आपलं नातं खूप मजबुतीने सांभाळून ठेवतात आणि प्रेमाला विवाहाच्या टप्प्यापर्यंत घेऊन जातात. वैवाहिक जीवनातही ते एक जबाबदार जोडीदार असतात.
मंगळाच्या कृपेने मिळेल यश - मूलांक ९ च्या लोकांवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे हे लोक शौर्यवान आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त (फिट) असतात. ते धैर्यवान आणि उत्साही असतात. पण आळस केल्यास त्यांच्यावर मंगळाचा वाईट प्रभाव पडतो. ९ नंबरच्या लोकांचं करिअर स्थिर असतं आणि आपल्या कठोर परिश्रमाने हे लोक जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होतात. शनिवारी, मंगळवारी हनुमान चालीसा वाचणे या लोकांसाठी शुभ असतं.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
