चंद्राचा प्रवास धनिष्ठा नक्षत्राच्या उत्तरार्धापासून रेवती नक्षत्रापर्यंत असतो, तेव्हा त्याला पंचक काळ म्हणतात. पंचकामध्ये अग्नी, जल, वायू, पृथ्वी आणि आकाश ही पाच तत्वं सक्रिय असतात, ज्यामुळं काही विशिष्ट कामे करणे टाळावे, असं शास्त्र सांगतं. पंचांगानुसार, डिसेंबर 2025 मध्ये पंचक 24 डिसेंबर बुधवारपासून सुरू होऊन 29 डिसेंबर सोमवारपर्यंत असणार आहे. 24 डिसेंबरला बुधवार असल्यामुळं याला राज पंचक म्हटलं जाईल. या पाच दिवसांच्या काळात तुम्हाला काही खास गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. हे वर्ष 2025 मधील शेवटचं पंचक असणार आहे आणि म्हणूनच याचा प्रभाव अनेक महत्त्वाच्या कामांवर पडू शकतो.
advertisement
पंचकात काय करू नये -
या काळात पलंग किंवा खाट बनवणं टाळावं. शास्त्रानुसार, या काळात शय्येचं निर्माण करणं अशुभ मानलं जातं. असं केल्यानं घरात कलह आणि तणाव वाढू शकतो. पंचक काळात लाकूड, गवत किंवा इतर ज्वलनशील वस्तूंचा साठा करू नका. या काळात असं केल्यानं भविष्यातील कामं अडकू शकतात आणि आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच गरजेची कामं आधीच उरकून घ्या आणि या काळात नवीन सामानाचा संग्रह करणं टाळा.
नक्कीच शुभ संकेत समजावेत! पहाटेच्या वेळी स्वप्नात अशा गोष्टी भाग्यवानांना दिसतात
या काळात दक्षिण दिशेला प्रवास करणं निषिद्ध मानलं गेलं आहे. दक्षिण दिशा ही यम आणि पितरांशी संबंधित मानली जाते आणि पंचकाच्या वेळी तिथं प्रवास केल्यानं अडथळे आणि अडचणी येऊ शकतात.
घराचं छप्पर/स्लॅब टाकण्याचं काम सुद्धा या काळात करू नका. पंचकात असं केल्यानं कौटुंबिक कलह आणि आर्थिक नुकसानाची भीती वाढते. या काळात बांधकाम करणं खूपच गरजेचं असेल, तर एखाद्या ज्योतिषाचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. पंचकात लग्न, गृहप्रवेश किंवा इतर कोणतेही मांगलिक आणि शुभ कार्य करणं टाळावं. या काळात शुभ कार्य केल्यास त्याचं फळ अपूर्ण राहू शकतं आणि घर-कुटुंबातील समस्या वाढू शकतात.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
