या बदलामुळे या राशींच्या व्यक्तींना करिअर, आर्थिक क्षेत्र, समाजात मान-सन्मान आणि वैयक्तिक जीवनात यश मिळण्याची संधी आहे. जाणून घेऊया, कोणत्या राशींना काय लाभ होणार आहे
तूळ राशी
बुध ग्रह तुमच्या व्यवसाय आणि करिअरच्या क्षेत्रात मार्गी होत असल्यामुळे हा काळ फारच फलदायी ठरू शकतो.करिअरमध्ये प्रगतीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचे कौशल्य ओळखले जाईल. नोकरीत पदोन्नती,पगारवाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय करत असाल, तर त्यात वाढ होईल, नवीन क्लायंट्स जोडले जातील.बेरोजगार लोकांना नोकरीची संधी मिळू शकते. यशासाठी केलेली मेहनत वाया जाणार नाही, कारण या काळात नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी
बुध ग्रह भाग्य स्थानात मार्गी होत आहे. त्यामुळे तुमचे नशीब चांगल्या गोष्टींसाठी काम करणार आहे.धार्मिक, आध्यात्मिक किंवा शुभ कार्यांमध्ये सहभागी होण्याचे योग आहेत.
लहान प्रवास लाभदायक ठरतील. नवीन संधी, नवीन योजना तुमच्या मनात येतील.
तुम्ही एखादं नवीन काम सुरु करू शकता. व्यवसाय, शिकवणी, किंवा स्वतंत्र प्रोजेक्ट्स. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आहे. अभ्यासात मन लागेल आणि परीक्षेत चांगले निकाल मिळतील. कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल आणि घरात एखादं शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.
मिथुन राशी
बुध ग्रह तुमच्या राशीपासून दुसऱ्या स्थानात मार्गी होत आहे. ज्याचा संबंध आहे धन, कुटुंब आणि संवाद कौशल्याशी.अचानक धनलाभाचे प्रबळ संकेत आहेत. गुंतवणुकीत फायदा होईल. मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे.जमीन, घर किंवा वाहनसुख लाभेल.
नोकरी करणाऱ्यांना स्वतःची क्षमता दाखवण्याची संधी मिळेल. तरुण वर्गासाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे, विशेषतः जे काही काळापासून योजना आखत आहेत.
तुमच्या बोलण्यात आकर्षकपणा वाढेल आणि त्यामुळे सामाजिक संबंध अधिक दृढ होतील.