नवीन वर्ष 2026 हे मूलांक 3 असणाऱ्यांसाठी अनेक आश्चर्यांनी भरलेले असेल. काही घटना अपेक्षेपेक्षा अधिक आनंददायी असतील, तर काही अनपेक्षित अडचणी निर्माण होऊ शकतात. कधी वाटेल की हे वर्ष खूप काही देऊन जाते आहे, तर कधी वाटेल की अनपेक्षित अडथळे येत आहेत. नवीन वर्ष 2026 च्या अंकांची बेरीज 10 येते आणि त्याचा एकांक 1 मिळतो. अंक 1 चा स्वामी सूर्य आहे, तर मूलांक 3 चा स्वामी गुरू. सूर्य आणि गुरु हे परस्परांचे मित्र ग्रह मानले जातात. त्यामुळे 2026 हे वर्ष मूलांक 3 असणाऱ्यांसाठी एकूणात शुभ आणि अनुकूल ठरण्याची शक्यता अधिक आहे.
advertisement
या वर्षातील पहिले सहा महिने थोडे आव्हानात्मक ठरतील, परंतु या काळात शांतपणे, समजून घेत केलेले निर्णय पुढील सहा महिन्यांना अधिक फायद्याचे असतील. वर्षाच्या दुसऱ्या टप्प्यात सुखद घटना आणि समाधानाचे क्षण अनुभवायला मिळतील. करिअरच्या दृष्टिकोनातून, नवीन नोकरी शोधत असणाऱ्यांनी घाईगडबडीत नोकरी बदलू नये. मोठी ऑफर आली तर तिचे सर्व पैलू नीट तपासून मगच निर्णय घ्यावा. विश्वासू व्यक्तींचा सल्ला घ्यायलाही हरकत नाही. मूलांक 3 असणाऱ्यांकडे भरपूर ज्ञान असते, पण कधी कधी अतिउत्साह किंवा अतिआत्मविश्वास त्यांना अडचणीत आणू शकतो. त्यामुळे या वर्षी संयम, समजूतदारपणा आणि विचारपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.
करिअरमध्ये प्रगती निश्चित होईल, पण प्रत्येक टप्प्यावर काही ना काही आव्हाने येतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी अधिक मेहनत करावी लागेल. भाग्यावर अवलंबून राहणे योग्य ठरणार नाही. 2026 मध्ये मूलांक 3 असणारे अनेक प्रवास करतील. धार्मिक प्रवास मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढवतील, तर व्यावसायिक प्रवास करिअरमध्ये प्रगतीसाठी उपयुक्त ठरतील.
या दिशेला घराचा दरवाजा असल्यास चोरी होण्याचा धोका जास्त; वास्तुशास्त्र उपाय
या वर्षी अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. अनेक वर्षांपासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात, ससुराळीकडून किंवा पितृसंपत्तीतून लाभ मिळू शकतो, तसेच पूर्वी केलेल्या निवेशातून चांगला फायदा होऊ शकतो.
वैवाहिक जीवनात काही मतभेद किंवा वादविवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलण्यात संयम आणि वर्तणुकीत शांतता राखावी. कोणतीही गोष्ट ताणतणावापर्यंत नेऊ नये. प्रेमसंबंधात असणाऱ्यांनीही पार्टनरशी संवाद राखावा. तणाव निर्माण झाला तर मनमोकळेपणाने बोलून तो दूर करावा. छोट्या गोष्टींवरून नाते खराब होऊ देऊ नये. अद्याप अविवाहित असणाऱ्यांसाठी या वर्षी विवाहयोग आहे.
नवविवाहित किंवा संततीची इच्छा असणाऱ्यांसाठी संतानयोग अनुकूल आहे. ज्यांना मुलं आहेत त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि निष्काळजीपणा टाळावा.
मूलांक 3 असणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना -
वर्षभर आपले इष्टदेव यांची नियमित पूजा व मंत्रजप करावा.
धार्मिक स्थळांच्या यात्रांनी मानसिक शांती आणि जीवनात संतुलन मिळेल.
निर्णय घेताना घाई करू नये.
बोलण्यात संयम ठेवावा आणि रागावर नियंत्रण ठेवावे.
वेळ आणि ऊर्जा वाया घालवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे.
अतिआत्मविश्वास टाळावा. कोणतीही गोष्ट नीट तपासूनच निर्णय घ्यावा.
इतरांचे सल्ले ऐकावे. काही वेळा ते अत्यंत उपयुक्त ठरतात.
शिस्त, धैर्य आणि संयम या तिन्ही गोष्टी वर्षभर पाळाव्यात.
वर्षातील शेवटच्या पौर्णिमेपासून या राशींचा चांगला काळ सुरू; धनलक्ष्मीचा आशीर्वाद
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
