मोहोळ तालुक्यातील शेतकरी दत्तात्रय दळवी यांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने एका एकरामध्ये कांद्याची लागवड केली. कांद्याच्या बियाणे दहा हजार तसेच कांद्यावर रोग होऊ नये यासाठी फवारणी, खत असा मिळून 20 ते 25 हजार रुपयांपर्यंतचा खर्च दत्तात्रय गवळी यांना कांदा लागवडीसाठी आला आहे. पण सध्या बाजारात कांद्याला भाव देखील नसल्यामुळे शेतकरी दत्तात्रय हवालदिल झाले आहेत.
advertisement
त्यांनी हा कांदा न काढून ट्रॅक्टरने रोटर मारून घेण्याचा निर्णय घेतला आहे तसेच रोटर मारून झाल्यावर मक्याची लागवड करणार आहेत. कांद्याला भाव चांगला मिळेल या आशेने दत्तात्रय गवळी यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती. अतिवृष्टी आणि बाजारात कांद्याला भाव मिळत नसल्याने जवळपास दत्तात्रय गवळी यांना दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
कांद्याला जर बाजारात भाव मिळाला असता तर दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न दत्तात्रय गवळी यांना मिळाले असते. कांद्यातून मिळणाऱ्या पैशाने मुलाला पुणे येथील एका उच्च कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्याचा निर्णय दत्तात्रय गवळी यांनी घेतला होता. पण कांद्याने पाहिलेल्या स्वप्नांवर पाणी फिरवले असून त्याच कांद्यावर आता ट्रॅक्टरने रोटर मारून घेण्याची वेळ शेतकरी दत्तात्रय गवळी यांच्यावर आली आहे. शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर शासनाने कांदा लागवड केलेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी? असे आवाहन बळीराजा दत्तात्रय दळवी यांनी केले आहे.





