मुलांसाठी नावे (Sons Names)
1. अमलेश (Amlesh)
अर्थ: शुद्ध किंवा निष्कलंक.
हे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता.
2. अमीश (Amish)
अर्थ: प्रामाणिक आणि शुद्ध.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या तुमच्या मुलासाठी हे सुंदर नाव देखील निवडता येईल.
advertisement
3. कार्तिक (Kartik)
अर्थ: नोव्हेंबर महिन्याशी संबंधित हे नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. हे शिवपुत्राचे (कार्तिकेय) नाव आहे.
4. आरव (Aarav)
अर्थ: 'शांत' किंवा 'मधुर ध्वनी'.
हे खूप सुंदर आणि सध्या ट्रेंडमध्ये असलेले नाव आहे.
5. निमेष (Nimesh)
अर्थ: 'डोळे मिचकावण्याइतका वेळ' (अतिशय क्षणभर) किंवा 'डोळ्यातील चमक'.
हे नाव वेगळे आणि अर्थपूर्ण आहे.
पैसा, पद-प्रतिष्ठा..! तळहातावर अशी भाग्यरेषा असणारे आयुष्यात मोठं नाव कमावतात
मुलींसाठी नावे (Daughters Names)
1. अन्या (Anya)
अर्थ: दयाळू. अन्या हे दुर्गा देवीचे एक रूप देखील आहे.
हे छोटे आणि अगदी वेगळे नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी सिलेक्ट करू शकता.
2. कियारा (Kiara)
अर्थ: तेजस्वी आणि प्रकाश (चमकदार).
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलीसाठी तुम्ही कियारा हे नाव निवडू शकता.
3. दिव्यांका (Divyanka)
अर्थ: दिव्यत्वाने परिपूर्ण (दिव्यतायुक्त) तेजस्वी व्यक्तिमत्त्व.
हे नाव तुमच्या मुलीसाठी खूप अर्थपूर्ण ठरू शकते.
4. अद्विका (Advika)
अर्थ: अनोखी किंवा अतुलनीय अशी मुलगी.
तुमच्या मुलीसाठी हे नाव निवडल्यास ते खूप वेगळे वाटेल.
5. तनिष्का (Tanishka)
अर्थ: देवी लक्ष्मीच्या अनेक नावांपैकी हे एक नाव आहे. याचा एक अर्थ 'सोन्यासारखी चमक' असाही होतो.
अशी धार्मिक आणि सुंदर नावं तुम्ही तुमच्या मुलीसाठी निवडू शकता.
Baba Vanga Predictions: वर्ष 2026 मध्ये मालामाल होणार! बाबा वेंगाची भविष्यवाणी ऐकून जाग्यावर नाचणार या राशींचे लोक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
