कमलेश वैद्य यांची अगोदर एक हॉटेल होती पण काही कारणास्तव बंद झाली. नंतर दुसरीकडे 15 ते 20 वर्ष आचारी म्हणून काम केले व आता परत जोमाने स्वतःचे नाश्ता सेंटर सुरू केले आहे. मिसळ पाव आणि वडापाव हे प्रसिद्ध आहे त्यामुळे पैठणला जाणारे प्रवासी तसेच परिसरातील औद्योगिक वसाहतीमधील कर्मचारी या ठिकाणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात.
advertisement
हिरा नाश्ता सेंटरमध्ये सर्व पदार्थ गरम दिले जातात, त्यामुळे ग्राहक प्रफुल्लित होते व पुन्हा या ठिकाणी येते. दररोज येथे बेसन पीठ 30 किलो तर तेल 20 लिटर लागते, तसेच सर्व पदार्थांमध्ये घरगुती स्वतः बनवलेले मसाले वापरले जातात, त्यामध्ये बटाटे चटणी, लाल मिर्च व शेंगदाणे चटणी यासह विविध प्रकारच्या चटण्या दिल्या जातात. सुरुवातीच्या काळात ग्राहकांचा जास्त प्रतिसाद नव्हता मात्र कालांतराने पदार्थांमध्ये दर्जेदारपणा वाढवला आणि एक-एक करून ग्राहक येऊ लागले त्यामुळे आजच्या घडीला गर्दी येथे पाहायला मिळते, असे देखील वैद्य यांनी म्हटले आहे.





