मूलांक 1 : तुमचे शत्रू चाल करतील त्यांची रणनीती तुम्हाला काही प्रकारे नुकसान पोहोचवू शकते. प्रत्येकाशी व्यवहार करताना संयम ठेवा आणि शांत रहा. महिन्याच्या मध्यात, तुम्ही आव्हानात्मक कामात गुंतलेले असाल, ज्यासाठी अधिक शारीरिक प्रयत्न, शिस्त आणि लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असू शकते. तुमच्यात स्पर्धेची भावनाही अधिक असेल. जर तुमची पदोन्नती आणि वेतनवाढ बऱ्याच काळापासून प्रलंबित असेल, तर याबद्दलही चर्चा होऊ शकते.
advertisement
मूलांक 2 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 तारखेला झाला आहे)हा महिना अनावश्यक खर्च, आत्मपरीक्षणाचा असू शकतो. स्वतःबद्दल सखोल विचार करण्याची ही योग्य वेळ असेल. तुम्ही नकारात्मक विचार आणि वर्तन बदलण्याचा प्रयत्न कराल. सखोल आत्मपरीक्षणाच्या मदतीने, तुम्ही तुमच्या समस्यांवर उपाय शोधू शकाल. तुम्हाला काही काळ एकटे राहणे आणि तुमच्या समस्यांवर विचार करणे अधिक पसंत असेल. आयुष्यात येणाऱ्या सर्व आव्हानांवर मात करण्याचा तुमचा दृढनिश्चय असेल.
मूलांक 2 : अध्यात्म आणि ज्योतिष या दोन्हींच्या मदतीने तुम्हाला जीवनात अधिक चांगले आणि फोकस्ड वाटेल. काही जबाबदाऱ्या तुमच्याकडून काढून घेतल्या जाऊ शकतात, पण समर्पण आणि बांधिलकीने तुम्ही सर्व भूमिका आणि जबाबदाऱ्या परत मिळवू शकाल. तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.
मूलांक 3 (ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 तारखेला झाला आहे)हा महिना नेटवर्किंग, आर्थिक स्थिरता आणि जीवनातील ध्येयांप्रती गांभीर्य असा काहीसा आहे. या महिन्यात, तुमचा सामाजिक गोष्टींमध्ये सहभाग वाढेल, तिथे तुम्हाला तुमच्यासारखे विचार असलेले लोक भेटतील, जे भविष्यात तुम्हाला खूप आधार देऊ शकतात. तुम्ही तुमच्या जीवनातील महत्त्वाकांक्षांबद्दल अधिक गंभीर व्हाल आणि अधिक बांधिलकीने काम करून तुमचे ध्येय जलद गाठण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही खर्च कमी कराल किंवा फक्त उपयुक्त गोष्टींसाठी कराल. यामुळे तुमची आर्थिक स्थिरता कायम राहील. तुम्ही शेअर बाजारात चांगली रक्कम गुंतवू शकता.
मूलांक 3 : या महिन्यात पगार वाढीचेही संकेत आहेत, पगार वाढीसाठी उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा करावी. कामाच्या ठिकाणी, महिन्याच्या सुरुवातीला, एखादा सहकारी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय तुम्हाला सर्व कामात मदत करेल. एखादा जुना मित्रही तुम्हाला तुमच्या कामात मदत करू शकतो. तुम्हाला तुमच्या शत्रूंपासून सावध राहण्याचा आणि निरुपयोगी चर्चा टाळण्याचा सल्ला दिला जातो, कारण यामुळे तुमच्या कार्यालयात शत्रूंची संख्या वाढू शकते.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
