चोर पंचक म्हणजे काय? - पंचक म्हणजे चंद्राचे एका विशिष्ट नक्षत्रातून होणारे भ्रमण. ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र धनिष्ठा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणापासून रेवती नक्षत्रापर्यंत (एकूण पाच नक्षत्रांमधून) प्रवास करतो, तेव्हा त्या 5 दिवसांच्या कालावधीला पंचक म्हणतात. दिवसानुसार पंचकाचे वर्गीकरण केले जाते. पंचकाची सुरुवात शुक्रवारी होते, तेव्हा त्याला चोर पंचक असं म्हणतात.
चोर पंचकाला अत्यंत अशुभ मानलं जातं आणि त्याचे परिणाम जाणून घेऊ - 'चोर पंचक' नावाप्रमाणेच आर्थिक व्यवहारांसाठी अशुभ मानले जाते. या काळात कोणताही मोठा व्यवहार, व्यावसायिक करार, किंवा महत्त्वपूर्ण पैशाचे व्यवहार (कर्ज देणे/घेणे) केल्यास धनहानी होण्याची किंवा आर्थिक नुकसान होण्याची भीती असते. या काळात चोरी होण्याची शक्यता वाढते, त्यामुळे घराच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. चोर पंचकाच्या काळात प्रवास करणे टाळले जाते, विशेषतः दक्षिण दिशेचा प्रवास अत्यंत अशुभ मानला जातो. पंचक काळात केलेल्या कोणत्याही अशुभ कार्याची किंवा घटनेची पाच वेळा पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.
advertisement
चोर पंचकात कोणती कामे वर्ज्य आहेत?
चोर पंचक लागलेले असताना काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो. कर्ज देणे, कर्ज घेणे किंवा मोठा व्यावसायिक करार करणे टाळावे. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. प्रवास करणे अत्यंत आवश्यक असेल, तर हनुमानाची पूजा करून त्यांना फळे अर्पण केल्यानंतरच प्रवास करावा. घराचे छप्पर (लेंटल) घालणे किंवा नवीन बांधकाम सुरू करणे अशुभ मानले जाते. या काळात नवीन व्यवसाय किंवा गुंतवणूक सुरू करणे टाळावे. पंचक काळात पलंग किंवा खाट बनवणे अशुभ मानले जाते, ज्यामुळे घरात अशांतता निर्माण होऊ शकते. पंचक काळात कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यास ते अत्यंत अशुभ मानले जाते. अशा वेळी पंचकाची शांती करण्यासाठी मृतदेहासोबत पीठ किंवा तांदळाचे पाच पुतळे बनवून त्यांचे दहन केले जाते, जेणेकरून कुटुंबातील इतर सदस्यांवरचे संकट टळेल.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)