सिंह : केतूचा प्रभाव आणि मानसिक ताण
2026 मध्ये केतू ग्रह सिंह राशीतच विराजमान असणार आहे, तर शनीची साडेसाती किंवा ढैय्या नसल्या तरी शनीची विशेष दृष्टी या राशीवर पडेल. या राशीच्या लोकांना पोटाचे विकार आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. कष्ट करूनही त्याचे फळ उशिरा मिळाल्याने निराशा येईल. जोडीदारासोबत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींसोबत विनाकारण वाद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
advertisement
कुंभ : शनीची साडेसाती आणि राहूचे वास्तव्य
कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष सर्वात जास्त आव्हानात्मक असणार आहे. या राशीवर शनीच्या साडेसातीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा सुरू असेल, आणि त्याच वेळी राहू याच राशीत मुक्कामाला असेल. शनी-राहूच्या संयोगामुळे 'भ्रम' निर्माण होतो. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक कामात शेवटच्या क्षणी अडथळे येतील. अचानक ओढवलेल्या संकटामुळे नियोजित कामे लांबणीवर पडतील. प्रवासात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. वेगाने वाहन चालवणे टाळावे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
