कोणता ग्रह असतो 'मारकेश'?
कुंडलीतील दुसरे आणि सातवे घर हे 'मारक स्थान' मानले जाते. या घरांच्या स्वामींना 'मारकेश' म्हटले जाते. हे धन आणि कुटुंबाचे स्थान असले तरी, याला 'मारक स्थान' मानले जाते. हे जोडीदाराचे आणि व्यवसायाचे स्थान असले तरी, हे देखील मुख्य मारक स्थान आहे. त्याचप्रमाणे, कुंडलीतील 8 व्या घराचा स्वामी आणि 12 व्या घराचा स्वामी देखील परिस्थितीनुसार मारक प्रभाव देऊ शकतात.
advertisement
मारकेश ग्रहाचे गंभीर परिणाम
1. आरोग्यविषयक समस्या: मारकेश ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा सुरू झाल्यावर व्यक्तीला जुने आजार बळावणे किंवा अचानक नवीन गंभीर आजार होण्याचा धोका असतो. शरीर थकल्यासारखे वाटते आणि उपचारांचा प्रभाव लवकर पडत नाही.
2. मानसिक तणाव आणि भीती: या ग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्ती विनाकारण काळजीत राहते. मनात सतत नकारात्मक विचार येतात आणि भीतीचे वातावरण निर्माण होते. मानसिक शांतता पूर्णपणे भंग पावते.
3. आर्थिक नुकसान आणि कर्ज: दुसरे घर हे मारक स्थान असल्याने, मारकेशच्या काळात साठवलेले धन खर्च होते. गुंतवणुकीत मोठा तोटा होऊ शकतो किंवा व्यवसायात मोठे आर्थिक संकट उभे राहू शकते.
4. अपघाताची शक्यता: मारकेश हा 'मृत्युलतुल्य कष्ट' देणारा ग्रह असल्याने, या काळात वाहन चालवताना किंवा प्रवास करताना विशेष खबरदारी घ्यावी लागते. अपघातातून दुखापत होण्याचे योग या काळात अधिक असतात.
5. प्रतिष्ठा आणि कामात अडथळे: समाजात मानहानी होणे, वरिष्ठांशी वाद होणे किंवा नोकरी जाणे, असे प्रकार मारकेशच्या काळात घडू शकतात. तुमचे मित्र आणि जवळचे नातेवाईकही अशा वेळी तुमची साथ सोडू शकतात.
6. घरगुती कलह: मारकेशच्या प्रभावामुळे कुटुंबात विनाकारण वाद होतात. जोडीदाराशी असलेले संबंध बिघडतात आणि घरात सतत अशांतीचे वातावरण राहते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
