लोखंड - ज्योतिषशास्त्रात, लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. धनत्रयोदशी हा देवी लक्ष्मी आणि भगवान गणेश यांना समर्पित सण आहे. त्यामुळे धनत्रयोदशी लोखंड खरेदी करणं टाळा. यावर्षी धनत्रयोदशी शनिवारी येत असल्यानं घरात लोखंडाच्या वस्तू आणू नका.
मोहरीचे तेल - मोहरीचे तेल देखील शनिदेवाशी संबंधित आहे. म्हणूनच लोक दर शनिवारी शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करतात. धनत्रयोदशीला शनिवार असल्यानं मोहरीचं तेल खरेदी करणं टाळा. दिवे लावण्यासाठी ते आवश्यक असेल तर ते दुसऱ्या दिवशी खरेदी करा.
advertisement
काळ्या वस्तू - ज्योतिषशास्त्रात काळ्या वस्तू शनिशी संबंधित मानल्या जातात. धनत्रयोदशी हा एक अतिशय शुभ दिवस आहे आणि या शुभ वेळी घरी कोणत्याही काळ्या वस्तू आणणे टाळा. असे म्हटले जाते की काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक आहे आणि या शुभ प्रसंगी त्या घरी आणणे अशुभ मानले जाते.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक म्हणजे काम कमी अन्..! शनिशी संबंधित असल्यानं
स्टील - कित्येक लोक धनत्रयोदशीला स्टीलची भांडी खरेदी करतात. कदाचित त्यांना माहिती नसेल की स्टीलमध्येही लोखंड असते. म्हणून,धनत्रयोदशीला स्टीलची भांडी खरेदी करण्याची चूक करू नका.
रिकामी भांडी - धनत्रयोदशीला काही भांडी, मटका किंवा इतर कोणतेही भांडे खरेदी करत असाल तर ते रिकामे घरी आणू नका. घरी आणण्यापूर्वी भांड्यात धणे, पाणी किंवा काही गोड पदार्थ घालून आणा. असं करणं शुभ मानलं जातं.
चामड्याच्या वस्तू - धनत्रयोदशीच्या पवित्र सणाला चामड्याच्या वस्तू खरेदी करू नका. त्या गोष्टी प्राण्यांच्या कातडीपासून बनवल्या जातात. त्यादिवशी घरी पर्स, बेल्ट, बॅग किंवा चामड्यापासून बनवलेल्या इतर कोणत्याही वस्तू आणणे टाळा.
दिवाळीतच संकट! गुरुची अतिचारी स्थिती या राशीच्या लोकांना त्रासदायक, कामात विघ्ने
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)