हिंदू धर्मग्रंथांमध्ये शिवलिंगाला अभिषेक करण्यासाठी गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते. गंगाजल उपलब्ध नसेल तर भगवान शिवाला स्वच्छ नदी, विहीर किंवा शुद्ध पिण्याच्या पाण्याने अभिषेक करता येतो. शास्त्रांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, पाण्यात जीवन देणारी शक्ती असावी. हे पाणी केवळ शुद्धच नसावे, तर त्यात नैसर्गिक गुणधर्म देखील असले पाहिजेत. आरओ पाणी प्रत्यक्षात गाळण्याच्या प्रक्रियेतून जाते, ज्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम सारखे विरघळलेले खनिजे पाण्यातून काढून टाकली जातात. हे पाणी पिण्यायोग्य आहे, परंतु त्याचे नैसर्गिक गुणधर्म कमी झालेले असतात.
advertisement
शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की, रासायनिक प्रक्रियेने शुद्ध केलेले पाणी देवांना अर्पण करू नये. आरओ पाणी शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे, कारण त्यात नैसर्गिक गुणधर्म नसतात. शिवतत्व निसर्गाशी जोडलेले आहे आणि त्याला अर्पण केलेले पाणी देखील नैसर्गिक असले पाहिजे. आपल्याकडे आरओ पाण्याशिवाय दुसरे कोणतेही शुद्ध पाणी उपलब्ध नसेल, तर त्यात गंगाजल घालून आरओ पाणी शुद्ध करता येते. जलाभिषेकात हातपंपाचे स्वच्छ पाणी देखील वापरले जाऊ शकते. श्रावण महिन्यात शिवलिंगावर दूध, दही, मध, तूप, गंगाजल, नारळजल आणि फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. या सर्व गोष्टी जीवनाशी संबंधित मानल्या जातात आणि महादेवाला देखील प्रिय आहेत.
गजलक्ष्मी राजयोग अखेर जुळला! आता चमकण्याचे दिवस या 4 राशींच्या नशिबात
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)