TRENDING:

महत्त्वाची माहिती! नोकरी, लग्न आणि हवे ते प्रमोशन; नवीन वर्षात या राशीच्या लोकांना मिळणार सर्वकाही

Last Updated:

सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे 2024 हे वर्ष तीन राशींसाठी उत्तम असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परमजीत कुमार, प्रतिनिधी
राशीभविष्य
राशीभविष्य
advertisement

देवघर, 12 डिसेंबर : कोणताही ग्रह एका विशिष्ट वेळी दुसर्‍या राशीत प्रवेश करतो आणि जेव्हा तो प्रवेश करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर होतो. हा ग्रहप्रवेश काही राशींसाठी फायदेशीर तर काही राशींसाठी नुकसानकारक असतो. धैर्य, शौर्य आणि बुद्धिमत्तेसाठी जबाबदार मानला जाणारा मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे.

मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती असेही म्हटले जाते. त्यामुळे कोणत्या तारखेला मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे आणि कोणत्या राशींवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडेल? याबाबत देवघरच्या ज्योतिषाकडून जाणून घेऊयात.

advertisement

देवघरचे प्रसिद्ध ज्योतिष आचार्य पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितले की, मंगळ ग्रह धनु राशीमध्ये 27 डिसेंबरला रात्री 8 वाजून 26 मिनिटांनी प्रवेश करणार आहे. तसेच याआधी, सूर्य धनु राशीमध्ये उपस्थित होणार आहे. सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे 2024 हे वर्ष तीन राशींसाठी उत्तम असणार आहे. या तीन राशीच्या लोकांसाठी अचानक आर्थिक लाभ आणि सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये मेष, सिंह आणि कन्या यांचा समावेश आहे.

advertisement

या तीन राशीच्या लोकांना होणार फायदा -

मेष राशी : मेष राशीच्या लोकांसाठी धनु राशीतील मंगळ ग्रहाचा प्रवेश सकारात्मक परिणाम देणारा आहे. या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आत्मविश्वासही वाढणार आहे. नशीब तुमच्या सोबत असेल त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच आरोग्यही चांगले राहील.

advertisement

सिंह राशी : या राशीच्या लोकांसाठी मगंळ ग्रहाचे धनु राशीत प्रवेश करणे सकारात्मक राहणार आहे. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होऊ शकतो. तसेच जर जमीन आणि वाहन खरेदीसाठी तुम्हाला वेळ अनुकूल आहे. तसेच जमीन खरेदी विक्रीतून धनलाभाचा योगही तयार होत आहे. मनही प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनात आनंदी राहाल.

कन्या राशी : या राशीच्या लोकांसाठी 2024 ची सुरुवात खूप चांगली होणार आहे. मगंळ ग्रहाचे धनु राशीत प्रवेश करणे कन्या राशीच्या लोकांसाठी सकारात्मक राहणार आहे. मनातील इच्छा पूर्ण होतील. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीमध्ये हव्या त्या ठिकाणी बदली तसेच पदोन्नती होईल. या राशीच्या लोकांचे आरोग्यही चांगले राहील.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
महत्त्वाची माहिती! नोकरी, लग्न आणि हवे ते प्रमोशन; नवीन वर्षात या राशीच्या लोकांना मिळणार सर्वकाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल