यासाठी श्रीमद्भगवद्गीतेची शिकवण आधुनिक जीवनासाठी आजही तितकीच मार्गदर्शक ठरते आहे. पाच हजारांहून अधिक वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेची शिकवण दिली होती आणि आजही ही सूत्रे तितकीच प्रासंगिक आहेत.
इतकेच नाही तर भगवद्गीता हा हिंदू धर्माचा एकमेव धार्मिक ग्रंथ आहे, ज्याची जयंती साजरी केली जाते. दरवर्षी गीता जयंती मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील एकादशी असते, सोमवारी गीता जयंती पार पडली.
advertisement
गीतेचे पहिले सूत्र म्हणजे 'निःस्वार्थ कृती' - याचा अर्थ, कृतीवर लक्ष केंद्रित करा, परिणामांची काळजी करू नका. कामाच्या ठिकाणी बहुतांशी ताण हा अपेक्षांमुळे वाढतो. एखादी व्यक्ती आपले काम मनापासून करते आणि परिणामांची चिंता करणे सोडून देते तेव्हा मानसिक दबाव आपोआप कमी होतो. याशिवाय कामाचा दर्जाही सुधारतो आणि मनही शांत राहते.
अखेर दिवस आपले! 7 डिसेंबरला मंगळ धनु राशीत आला की 4 राशीच्या लोकांची दिवाळी
दुसरे सूत्र समानता - यश आणि अपयश या दोन्हींचा समान आदराने स्वीकार करणे. आजचे व्यावसायिक जीवन प्रत्येकासाठी चढ-उतारांनी भरलेले आहे. प्रत्येक प्रकल्प यशस्वी झाला पाहिजे, प्रत्येक करार फायदेशीर असावा, प्रत्येक प्रयत्न फळाला यावेत असं होणार नाही. म्हणून गीता शिकवते की, परिणाम काहीही झाले तरी माणसाने स्थिर राहिलं पाहिजे.
तिसरे सूत्र 'मनाचे नियंत्रण' - डिजिटल युगात नोटिफिकेशन्स, फोन कॉल्स, चॅट्स, व्हिडिओ, मीटिंग्स आणि सोशल मीडिया या गोष्टी मनाला अस्थिर बनवतात. गीतेनुसार, ज्याने मन जिंकले आहे त्याचे जीवन सोपे होते. म्हणजे वरील सर्व गोष्टी सोडून कामाच्या ठिकाणी पूर्ण एकाग्रता असली पाहिजे आणि घरी, कुटुंबासाठी मनापासून वेळ द्यायला हवा. काम-जीवन संतुलित करण्यासाठी हा नियम सर्वात प्रभावी सूत्र आहे.
