कुटुंबीयांनी पारंपरिक पिकांऐवजी काही वेगळं करण्याचा सल्ला दिल्यानंतर विष्णू यांनी आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि कांदा लागवडीचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला त्यांनी फक्त 10 गुंठ्यांमध्ये कांद्याचे पीक घेतले. पहिल्याच हंगामात त्यांना चांगला नफा मिळाला आणि योग्य व्यवस्थापन केल्यास कांदा पीक कमी क्षेत्रातही चांगलं परतावा देऊ शकतं, यावर त्यांचा विश्वास बसला.
advertisement
यानंतर त्यांनी दुसऱ्या वर्षी जवळपास अर्ध्या एकर क्षेत्रात कांदा लागवड केली. वाढत्या अनुभवासोबत उत्पादन आणि दर्जा दोन्ही सुधारले. बाजारातील चढ-उताराचा नीट अभ्यास करून त्यांनी योग्य वेळी विक्री केल्याने चांगला उत्पन्नाचा मार्ग मोकळा झाला. सलग दुसऱ्या यशस्वी हंगामानंतर त्यांनी कांद्याकडे पूर्णवेळ व्यवसाय म्हणून पाहण्यास सुरुवात केली.
आज मागील चार वर्षांपासून विष्णू राठोड सतत एक एकर क्षेत्रात कांदा लागवड करत आहेत. योग्य देखरेख, नियमित खत व्यवस्थापन, खर्चावर नियंत्रण आणि बाजारभावाचा वेळीच अभ्यास यामुळे एका सीजनमध्ये ते तब्बल 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहेत. कमी जमिनीतही शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते, याचा आदर्श त्यांनी उभारला आहे.
कमी क्षेत्र असूनही हार न मानता मेहनतीने पुढे जाणाऱ्या विष्णू राठोड यांची कामगिरी अनेक तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. पारंपरिक पिकांपेक्षा नियोजनबद्ध आणि बाजाराभिमुख लागवड केल्यास लाभदायक शेती शक्य आहे, याचा उत्कृष्ट नमुना त्यांनी दाखवून दिला आहे. नित्रुडच्या या तरुण शेतकऱ्याने छोट्या जमिनीवर मोठे स्वप्न पेरून त्याची यशस्वी कापणी केली आहे.





