वरदान देणारी लक्ष्मी: वरदलक्ष्मी म्हणजे वर वरदान देणारी लक्ष्मी. पौराणिक कथेनुसार, या व्रताचे पालन केल्याने साक्षात लक्ष्मीदेवी प्रसन्न होते आणि भक्तांना ऐश्वर्य, संपत्ती, आरोग्य, ज्ञान आणि संतती असे आठ प्रकारचे आशीर्वाद देते. या व्रतामागे एक कथा सांगितली जाते. एकदा पार्वती मातेने शाप दिलेल्या एका गणाला याच व्रतामुळे रोगमुक्ती मिळाली होती. तेव्हापासून हे व्रत सौभाग्य आणि समृद्धीसाठी केले जाते.
advertisement
वरदलक्ष्मी व्रत 2025 व्रत आज 8 ऑगस्ट 2025 शुक्रवारी आहे. पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे लवकरपासूनच पूजेला सुरुवात करू शकता. तुम्ही सकाळी पूजा करू शकता किंवा सायंकाळी शुभ मुहूर्तावर पूजा करू शकता.
वरदलक्ष्मी व्रताची पूजा विधी -
चौरंगावर लाल किंवा पिवळे वस्त्र घालून त्यावर तांदळाचा एक ढिग ठेवावा.
कलश स्थापना: तांदळाच्या ढिगावर कलश (तांब्याचा किंवा चांदीचा) ठेवावा. कलशात पाणी, अक्षता, सुपारी, नाणे आणि आंब्याची पाने टाकावीत. कलशावर नारळ ठेवून त्यावर हळद-कुंकू लावावे.
देवीचे आवाहन: कलशावर हळदी-कुंकू आणि अक्षता वाहून देवी वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. अनेक ठिकाणी देवीची मूर्ती किंवा मुखवटा कलशावर ठेवून पूजा केली जाते. देवीला साडी नेसवून, अलंकार घालून सजवले जाते.
षोडशोपचार पूजा: यानंतर गणपतीची पूजा करून देवीची षोडशोपचार (सोळा गोष्टींनी) पूजा करावी. यात देवीला फुलं, दुर्वा, हळद-कुंकू, तुळशीची पाने अर्पण करावी. देवीला विविध प्रकारचे गोड पदार्थ, विशेषतः २१ अप्पे किंवा मोदक, पुरणपोळी, खीर आणि विविध फळांचा नैवेद्य दाखवावा.
व्रत कथा आणि आरती: पूजा झाल्यावर वरदलक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. त्यानंतर देवीची आरती करावी. पूजा पूर्ण झाल्यावर घरातील सौभाग्यवती स्त्रिया आणि पूजेसाठी आलेल्या स्त्रियांना हळद-कुंकू लावून त्यांना वाण (खण-नारळ) द्यावे.
वरदलक्ष्मी व्रताचे पालन केल्याने लक्ष्मीचा आशीर्वाद कुटुंबाला मिळतो आणि घरात धन-धान्याची कधीही कमतरता भासत नाही, अशी दृढ श्रद्धा आहे.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)