पण यावर कोणताही अवघड उपाय करण्याची गरज नाही. काही छोटे बदल करून तुम्ही शौचालयाची दिशा कोणतीही असली तरी त्याचा नकारात्मक प्रभाव सहज कमी करू शकता. आलेल्या अनुभवावरून वास्तु तज्ज्ञ हिमाचल सिंह यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
शौचालयाची योग्य दिशा -
वास्तूनुसार शौचालय केवळ दोन मुख्य दिशांना असणं चांगलं मानलं जातं:
advertisement
दक्षिण-दक्षिण पश्चिम (South-South West)
पश्चिम-उत्तर पश्चिम (West-North West)
या दिशांना शौचालय असल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा कमी राहते. पण बऱ्याचदा आर्किटेक्चर किंवा जागेमुळं इतर दिशांमध्ये शौचालय बनवलं जातं. अशा वेळी लोकांना काय उपाय करावा हे सुचत नाही आणि घरामध्ये नकारात्मक परिणाम जाणवू लागतात.
तुमच्या घरातील शौचालयाची दिशा कोणतीही असो, त्याचा नकारात्मक प्रभाव खूप प्रमाणात कमी करता येतो. यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे वापर झाल्यावर शौचालयाचं झाकण नेहमी बंद ठेवणं.
शनिवारी सकाळी 7.50 वाजल्यापासून नशिबाची चक्र उलटी फिरणार; अडचणीत येणार 6 राशी
शौचालय वापरल्यानंतर त्याचं झाकण नक्की बंद करा. हा छोटासा उपाय शौचालयातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पसरण्यापासून रोखतो. यामुळे घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
अनेक लोक या प्रॉब्लेमसाठी माती किंवा क्रिस्टल ठेवण्यासारखे उपाय करतात, पण सर्वात प्रभावी आणि साधा मार्ग म्हणजे झाकण बंद ठेवणं. हा उपाय कोणत्याही दिशेला असलेल्या शौचालयासाठी लागू होतो आणि लगेच सकारात्मक परिणाम देतो.
वास्तुशास्त्रानुसार शौचालय ही अशी जागा आहे जिथं नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात असते. तुम्ही झाकण बंद ठेवता, तेव्हा ही ऊर्जा घराच्या इतर भागात पसरत नाही. घरात शांतता आणि सकारात्मक वातावरण टिकून राहतं. आरोग्य आणि मानसिक स्थितीवर याचा चांगला परिणाम होतो. या उपायासाठी तुम्हाला कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्याची किंवा घराचं बांधकाम बदलण्याची गरज नाही. फक्त नियमितपणे शौचालयाचं झाकण बंद ठेवण्याची सवय लावून घेणं पुरेसं आहे.
पती-पत्नीला 'उजव्या-डाव्या'चे हे नियम माहीत हवेच; सुखी संसाराला या गोष्टी पूरक
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
